

Wardha Crime
sakal
वर्धा : सध्याच्या स्पर्धेच्या युगात युवा पिढी दिखाव्यावर जात असल्याचे जीवंत उदाहरण हिंगणघाट पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा छडा लावलेले प्रकरण ठरत आहे. नातीने चक्क आजीच्या घरातून सोने चोरी करून त्यातून मिळालेल्या पैशातून कार, दुचाकी व आयफोनची खरेदी केली. हे सर्व साहित्य व चोरीचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.