Crime News: हिंगणघाटमध्ये पतीने पत्नीची हत्या करून घराशेजारी खड्डा खोदून मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, आरोपी पती फरार झाला आहे.
हिंगणघाट (जि. वर्धा) : इंदिरा गांधी वॉर्डातील एका घराशेजारील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पुरलेल्या अवस्थेत एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.