esakal | सुंदर पत्नी, एक मुलगी अन् सुखी संसार… मग नजर लागली तरी कुणाची?
sakal

बोलून बातमी शोधा

His marriage life was going on the right path but another woman entered there...

रमेश हरिश्‍चंद्र बघल्ले याचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर फुलसुद्धा उमलले होते. असे असतानाच रमेशच्या आयुष्यात तीन वर्षांपूर्वी दुसऱ्या स्रीने प्रवेश केला आणि त्याच्या सुखी संसाराची वाताहत सुरू झाली.

सुंदर पत्नी, एक मुलगी अन् सुखी संसार… मग नजर लागली तरी कुणाची?

sakal_logo
By
संतोष तापकिरे

अमरावती  : जीवनात कधी काय घडले, जीवनरुपी मार्गात कोण कोणाला आणि कधी भेटेल काही सांगता येत नाही. हेच बघा ना, त्याचे लग्न झालेले. सुंदर पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा सुखाचा संसार सुरू होता. मात्र, अचानक त्याच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि एका दुसऱ्याच स्रीने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला. मग काय? दुधात मिठाचा खडा पडल्यानंतर जसे दूध फाटल्याशिवाय राहत नाही, त्याचप्रमाणे त्याच्या सुखी संसाराचेही झाले. 

दुसरीच्या प्रेमात आंधळा झालेल्या पतीने आपल्या प्रेमातील काटा दूर करण्यासाठी पहिल्या पत्नीला बळजबरीने कीटकनाशक पाजून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हातूर्णा गावात घडली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल महिलेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. रमेश हरिश्‍चंद्र बघल्ले (वय 45, रा. हातूर्णा) याच्याविरुद्ध बडनेरा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

हेही वाचा - शादी डॉट कॉमवर दोघांचे प्रोफाईल मॅच झाले. मने जुळली, लग्नही झाले. मग उघड झाले हे सत्य...

रमेश हरिश्‍चंद्र बघल्ले याचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर फुलसुद्धा उमलले होते. असे असतानाच रमेशच्या आयुष्यात तीन वर्षांपूर्वी दुसऱ्या स्रीने प्रवेश केला आणि त्याच्या सुखी संसाराची वाताहत सुरू झाली. रमेश हा दुसरीसोबत त्यांच्या शेतातील घरात राहतो, तर पत्नी व मुलगी हातूर्णात राहते. अधूनमधून तो घरी जात होता आणि पत्नी व मुलाबाळांना शिवीगाळ करीत होता. 

अधिक माहितीसाठी - पालकमंत्र्यांनी असे घाणेरडे राजकारण करू नये, कोण म्हणाले असे...

शुक्रवारी (ता.30) हातूर्णा येथील घरी आल्यानंतर रमेशने पत्नी व मुलांना शिवीगाळ केली. त्यानंतर बळजबरीने पत्नीला बाथरूममध्ये नेऊन शेतात फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी पावडरचा घोळ पाजून हत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नीची प्रकृती गंभीर आहे. मुलीने घटनेची तक्रार बडनेरा ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी शुक्रवारी (ता.एक) रमेश बघल्लेविरुद्ध हत्येचा प्रयत्न, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.

संपादन - राजेंद्र मारोटकर

loading image