ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न कोरपना तालुक्याला विकासाची प्रतीक्षा

ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न कोरपना तालुक्याला विकासाची प्रतीक्षा
Updated on

कोरपना (जि. चंद्रपूर) : काश्मीरला देशाचा स्वर्ग नक्की म्हटले जाते; परंतु आपला स्थानिक भागही काही कमी निसर्गसंपन्न नाही. कोरपना तालुक्यात याची प्रामुख्याने प्रचिती येते. या तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा (Cultural heritage) लाभला आहे. अगदी पुरातन काळापासून यादव, भोसले, गोंडकालीन, निजामकालीन राज्यातील अस्तित्वाच्या खुणा आजही येथे आढळतात. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख बांधवांची धार्मिक स्थळे, चीन प्रवासी हुनसंग यांनी दक्षिण कोसलाची राजधानी भद्रावतीकडे जाण्यासाठी याच भागाची निवड केली, असे दाखला आहेत. शिखांचे गुरू नानक देव यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाल्याचे सांगितले जाते. माणिकगढ किल्ला, निसर्गनिर्मित धबधबे, धार्मिक महत्त्व असलेला हजरत दुल्हेशाह बाबांचा दर्गा आदी येथील सौंदर्यात भर घालतात; परंतु एवढे सारे असताना पर्यटनाच्या दृष्टीने या भूमीचा विकासच (There is no development in terms of tourism) झालेला नाही. रोजगारक्षम परिसर म्हणून ओळख असलेल्या या भागात पर्यटनाचा विकास होऊन स्थानिकांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी, एवढीच माफक अपेक्षा. (Historically-prosperous-Korpana-taluka-awaits-development)

औद्योगिकीकरणामुळे आलेली सुबत्ता आणि त्यामुळे पर्यावरणावर झालेला विपरीत परिणाम या तालुक्यात प्रवेश करताच जाणवायला लागला. एकीकडे शेतात राबणारा शेतकरी आणि उद्योगात काम करणारा मजूर एकाच गावात असल्याचे चित्र जागोजागी दिसले. गडचांदूरला पोहोचताच उद्योगांच्या विपरीत परिणामांची जाणीव झाली. या गावाचा श्वास प्रदूषणाने गुदमरला आहे, असे लोकांच्या बोलण्यातून जाणवले. त्यानंतर अंमलनाला आणि माणिकगडकडे वळलो. जाताना रस्त्याच्या कडेला आकाशासोबत स्पर्धा करणाऱ्या उंच टेकड्या आणि त्यावरील हिरवाई नजरेला पडली. या टेकड्यांवरील लाईम स्टोनमुळे सिमेंट प्रकल्प आले. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न कोरपना तालुक्याला विकासाची प्रतीक्षा
उपद्रव शोधपथकाने काढली ‘वरात’! ५० हजारांचा दंड वसूल

आर्थिक सुबत्ता आली. सोबत प्रदूषणही वाढले. शेती पडीक झाली. अंमलनाला येथे पोहोचताच विस्तीर्ण जलाशय बघून मन प्रसन्न झाले. या जलाशयाच्या तिन्ही बाजूंनी उंच डोंगर आहे. निसर्गाने येथे मुक्तहस्ते उधळण केली. परंतु, याचा पर्यटनासाठी उपयोग झाला नाही, याची खंतही वाटली. त्यानंतर माणिकगड गाठले. गोंडकालीन वैभवाच्या खाणाखुणा जागोजागी बघायला मिळाल्या. माणिकगडचे उंच उंच पहाड, पैनगंगा-वर्धा नदीचे निर्मळ सानिध्य, असा हा तालुका. पूर्व विदर्भात सर्वाधिक जिनिंग याच भागात आहेत. पैनगंगा कोळसा खाणीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

पर्यटनस्थळांनी समृद्ध प्रदेश

कोरपना तालुक्यात धानाई मंदिर धनकदेवी, तामसी देवस्थान, तुकडोजी नगर येथील जगन्नाथ बाबा देवस्थान, हजरत दुल्हेशाह बाबा दर्गा, कुसळ, दत्त मंदिर देवघाट, शिवमंदिर पारडी, घाटराई देवस्थान या स्थळांना ‘क’ वर्गीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. तर माणिकगड हे पर्यटनस्थळ व ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षित करण्यात आले. या स्थळांना भेट दिली. याचा पर्यटनासाठी आणखी चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो, असे लक्षात आले. पाच पांडव देवस्थान जेवरा, बिर्ला मंदिर माणिकगड, सिद्धीविनायक मंदिर अल्ट्राटेक, राधाकृष्ण मंदिर अंबुजा ही या भागातील प्रसिद्ध धार्मिकस्थळे आहेत.

ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न कोरपना तालुक्याला विकासाची प्रतीक्षा
OLX वरील मैत्रीने केला घात, कारमध्ये तरुणीवर बलात्कार

रोजगाराभिमुख स्थळांना विकासाची प्रतीक्षा

पकड्डीगडम सिंचन प्रकल्प, कारवाई गुफा, भीमकुंड धबधबा सावलहिरा, सिंगारपठार धबधबा, घाटराई धबधबा, बोदबोदी धबधबा मेहंदी, टांगाळा धबधबा, जांबुळधरा धबधबा, उमरहिरा धबधबा, संगमेश्वर धबधबा (कोडशी बु,) खिडक्या धबधबा जेवरा, पैनगंगा-वर्धा नदी संगम स्थळ भारोसा, पैनगंगा-विदर्भ नदी संगम स्थळ कोडशी, नानकपठार, बुद्ध लेणी गडचांदूर आदी पर्यटनस्थळे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.

पर्यटनाच्या बाबतीत मी स्वतः जागृत असून, राजुरा विधानसभा क्षेत्रातील अंमलनाला आणि माणिकगड किल्ल्याच्या विकासासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. नुकतेच सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून अंमलनाला प्रकल्पाजवळ सौंदर्यीकरण, मचान बोटिंग आणि विविध कामांची सुरुवात झाली. अंमलनाला क्षेत्र येत्या काही दिवसांत चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येईल.
- सुभाष धोटे, आमदार, राजुरा विधानसभा
ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न कोरपना तालुक्याला विकासाची प्रतीक्षा
baby adoption: मुलं दत्तक घ्यायचे आहे? वाचा संपूर्ण प्रक्रिया
कोरपना तालुका यवतमाळ जिल्हा व तेलंगणा राज्याच्या सीमेलगत आहे. हा तालुका जंगलव्याप्त व डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. काळ्या भूमीवर हिरव्या शालूने नटलेला असल्याने तसेच औद्योगिक क्षेत्र असल्याने पर्यटकांसाठी हे क्षेत्र आकर्षण ठरू शकते. या क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी वनविभाग, पर्यटन, खनिज विकास निधी व चांदा ते बांधा प्रकल्पाअंतर्गत या भागातील विकासाला गती देणे शक्य आहे.
- अरुण डोहे, नगरसेवक, नगरपरिषद, गडचांदूर
अंमलनाला प्रकल्पाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, ही समस्त गडचांदूरकरांची इच्छा आहे. त्यामुळे रोजगारसुद्धा उपलब्ध होईल. तसेच गडचांदूरच्या सौंदर्यात भर पडेल. पर्यटक आकर्षित होतील. आमदार सुभाष धोटे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणला.
- सचिन भोयर, माजी उपाध्यक्ष, नगर परिषद, गडचांदूर

(Historically-prosperous-Korpana-taluka-awaits-development)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com