अनधिकृत बांधकामांची ‘होळी’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

तेलीपुरा चौक, वाशीम बायपास, कौलखेड, खडकी परिसरात महानगरपालिकेची कारवाई

अकोला : महानगपालिकेतर्फे होळीच्या दिवशीही शहरातील विविध भागातील चार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यात आला.

महानगरपालिकेतर्फे गत आठवड्यापासून शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील शिकवणी वर्ग, व्यावसायिक गाळे, खासगी बांधकामे नियमबाह्यरित्या बांधण्यात आले. ही कारवाई सोमवारी होळीच्या दिवशीही ही कारवाई सुरू होती. तेलीपुरा चौक, वाशीम बायपास, कौलखेड आणि खडकी परिसरातील श्रद्धानगरात मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या उपस्थितीत अनधिकृत बांधकामांवर निष्‍कासनाची व दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली.

1. तेलीपुरा चौक
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तेलीपुरात चौक परिसारतील फिरोज शेख कमाल यांचे बांधकाम अनधिकृत आढळून आले. इमारतीच्या समोरच्‍या समास अंतरामध्‍ये अनधिकृतरित्‍या बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्‍यात आली.

2. वाशीम बायपास
वाशिम बायपास येथील आसिफ हुसेनी यांनी अनधिकृतरित्‍या बांधलेले टीनशेड पाडण्यात आले. त्यांना 25 हजार रुपयांचा दंड आकारला.

3. कौलखेड
कौलखेड परिसरातील बलवंत कडू यांनी मंजूर नकाशा व्‍यतिरिक्त जवळपास एक हजार चौरस फुटाचे तसेच चारही बाजूच्‍या समास अंतरामध्‍ये अनधिकृत बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई करण्यात आली. त्‍यांना 25 हजार रुपये दंड आकारण्यात आला.

4. श्रद्धानगर, खडकी
खडकी येथील श्रध्‍दानगर 2 येथील संतोष अग्रवाल यांनी मंजूर नकाशा व्‍यतिरिक्‍त अधिक बांधकाम केलेले आढळले. चारही बाजूच्‍या समास अंतरामध्‍ये जास्‍तीचे बांधकाम केले होते. त्‍यांच्‍या अनधिकृत बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई करण्यात आली. त्‍यांना एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holi of unauthorized construction