
अमरावती : मंत्र्याच्या मागे सततच धावपळ असते. खात्याची कामे, राज्याचा विकास, जनसंपर्क आणि बरेच काही. त्या सगळ्या धावपळीतही मंत्रीमहोदयांनी एखाद्याची आठवण ठेऊन त्याला भेटायला बोलवणे आणि त्याचा सत्कारही करणे. खूप महत्त्वाचे. असा अनुभव राज्याचे ग्रुहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात आला. आपल्या समाज कार्यातून अनाथांचे नाथ अशी ओळख निर्माण करणारे शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या सुशीला व तिचे अंध पती अशोक गोपाळराव देशमुख यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शाल, श्रीफळ व वस्त्र देऊन सन्मान केला.
शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील त्यांची मानसकन्या सुशीला आणि तिचे पती अशोक देशमुख यांच्या विवाहाला २००४ मध्ये अनिल देशमुख उपस्थित होते.
आज गृहमंत्री म्हणून अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांना त्या प्रसंगाची आठवण झाली. त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना सूचना देऊन संबंधित दाम्पत्याला बोलावून घेतले. त्यांची आस्थेने विचारपुस करून वस्त्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चु कडू, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंत वानखडे उपस्थित होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.