होम क्वॉरान्टाईनचा शिक्‍का असलेल्या व्यक्‍तीचा रस्त्यावर तडफडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

पुसदपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलमूर्ती नगरातील बोरगडी रोडवर होम क्वारंटाईन असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी (ता. 19) दुपारी पाचच्या दरम्यान आढळून आला आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : होम क्‍वारंटाईनचा शिक्‍का म्हणजे त्या व्यक्‍तीने घरातच बंदिस्त राहणे. जेणेकरून तो कोरोनाबाधित असला तरी त्याच्यापासून इतर नागरिकांना संसर्ग होऊ नये. मात्र या व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी घटना आज घडली. चक्‍क ज्याच्या हातावर होम क्‍वारंटाईनचा शिक्‍का आहे, अशा व्यक्‍तीचा मृतदेह रस्त्यावर आढळला आणि सगळीकडे खळबळ माजली.
पुसदपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलमूर्ती नगरातील बोरगडी रोडवर होम क्वारंटाईन असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी (ता. 19) दुपारी पाचच्या दरम्यान आढळून आला आहे.
कालच पुसदमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यामुळे येथे व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. अनेकजण मुंबई व पुण्यावरून गावाकडे परतले आहेत. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बोरगडी रोडवर ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळला तो गृह विलगीकरणात असून त्याच्या हातावर शिक्का मारलेला आहे.

सविस्तर वाचा - खबरदार, रस्त्यांवर जनावरे सोडाल तर...

तो चार दिवसापूर्वी नारायणगाववरून आला होता. त्याच्या पत्नीसह तो आज पायी वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी दोन वाजता एसटी बस स्थानकावरील तपासणी केंद्रात आला होता. तो भर उन्हात पत्नीसह पायी निघाला असता खाली कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या मृत्युचे कारण अद्याप समजले नसून उपविभागीय अधिकारी डॉक्‍टर व्यंकट राठोड, तहसीलदार वाहुरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्‍टर आशिष पवार व शहर ठाणेदार प्रमेश आत्राम घटनास्थळी पोहोचले. त्याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quartined Man died on road!