आशेचा किरण... "हे' औषध ठरू शकते कोरोनावरील संजीवनी बुटी!  

medicine
medicine

यवतमाळ : "कोविड 19'मुळे अनेकांचा जीव जात आहे. मृत्यूतांडव थांबविण्यासाठी सध्या एकही शाश्‍वत उपाय नाही. त्यामुळे "मोन्टेलुकास्ट' कोरानाविरोधात संजीवनी बुटी ठरू शकते. त्याचा वापर करावा. सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार यांनी दिली. तसे पत्र त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, डॉ. रमण गंगाखेडकर यांच्यासह मंत्री व अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठविले आहे. 

जग आज कोरोना विषाणूच्या दहशतीत आहे. अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत फक्त कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची चर्चा आहे. संसर्गाच्या भीतीपोटी संपूर्ण जग लॉकडाउन करण्याची वेळ मानवजातीवर आली. नॉर्मल फ्लूसारखाच आजार आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी इत्यादी लक्षणे तर बाकी सर्व विषाणूच्या आजारांसारखीच आहेत. मात्र, विषाणूच्या संसर्गामुळे 4-5 टक्के लोकांना अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. एक-दोन दिवसात त्यांना व्हेंटिलेटरवर टाकण्याची वेळ येते. त्यातील बऱ्याच रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

संसर्गाचा वेग मोठा असल्याने मानव जात कोरोना विषाणूला घाबरून आहे. या आजारात 80 टक्के रुग्णांना काहीच लक्षणे नसतात. 15 टक्के रुग्णांना काही सौम्य ते मध्यम लक्षणे दिसून येतात. जवळपास 14 दिवसांत ते यातून पूर्ण बरे होतात. परंतु, 4 ते 5 टक्के रुग्णांना खूप जास्त ताप येतो व अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. रुग्णाला बाहेरून ऑक्‍सिजन द्यावे लागते. काहींना कृत्रिम श्‍वाच्छोश्‍वासावर ठेवावे लागते. वैद्यकशास्त्रात रामबाण उपाय नसल्यामुळे रुग्ण दगावतात.

रामबाण औषध  ठरू शकते

सायटोकाईन स्टॉर्ममुळे शरीरात खूप मोठ्या प्रमाणात सूज येते. कोविड-19 मध्ये ही सूज फुफ्फुसाच्या पेशींवर येते व रुग्णाला श्‍वास घ्यायला त्रास सुरू होतो. सध्या जगात कोविड-19 या आजाराच्या उपचारासाठी तीन प्रकारच्या औषधांवर काम सुरू आहे. सध्या आपल्याकडे कोरोना विषाणूला मारण्यासाठी यशस्वी असे कोणतेही औषध नाही. सायटोकाईन स्टॉर्मवर मात मिळविण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. त्यात औषध वापरले जात आहे. पण हे औषध खूप महाग आहे व ते सहज उपलब्ध नाही. "मोन्टेलुकास्ट' हे औषध कोविड-19 ला हरविण्यासाठी रामबाण ठरू शकते. हे औषध सायटोकाईन अल्फा या फुफ्फुसावर सूज आणणाऱ्या केमिकल्सला रोखू शकते. त्यांना एका आवश्‍यक लेव्हलच्या वर येऊ देत नाही. त्यामुळे या सायटोकिन्समुळे येणारी फुफ्फुसावरील सूज थांबण्याची शक्ती यात दिसते आहे.

जगातील वेगवेगळ्या ठिकाणाच्या अनेक डॉक्‍टर्स केस रिपोर्ट ज्यात त्यांनी मोन्टेलुकास्ट वापरल्याने सायटोकाईन स्टॉर्मला आम्ही रोखू शकलो, असे म्हटले आहे, ते इंटरनेटवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त कॅनडा देशात मॅकगील युनिव्हर्सिटी व लेडी डेव्हिस इन्स्टिट्यूट या दोन विद्यापीठांना मोन्टेलुकास्ट या औषधाचा कसा फायदा होतो, याची परवानगी मिळाली आहे. हे आपल्यासाठी काही नवे औषध नाही. दमामध्ये हे औषध खूप दिवसांपासून वापरात आहे. मुख्य म्हणजे जेनेरिक औषध आहे. त्यामुळे अगदी स्वस्त व सहज उपलब्ध होते. मोन्टेलुकास्ट या सायटोकाईन स्टॉर्ममुळे होणाऱ्या फुफ्फुसातील रक्ताच्या गाठापण रोखू शकतो. एम्स, केईएमसारख्या प्रख्यात मेडिकल कॉलेजमध्ये क्‍निनिकल ट्रायल सुरू करावी, अशी मागणी डॉ. प्रशांत चक्करवार यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com