तासाभरात बारगळली नगराध्यक्षपदाची निवडणूक 

वाडी : नगराध्यक्ष राजेश थोराणे यांच्यासह 15 नगरसेवकासह बसलेले प्रेम झाडे.
वाडी : नगराध्यक्ष राजेश थोराणे यांच्यासह 15 नगरसेवकासह बसलेले प्रेम झाडे.

वाडी (जि.नागपूर) : प्रेम झाडे यांना अपात्र ठरविल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारी वाडी नगर परिषदेत दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने प्रेम झाडे यांना अपात्र ठरविण्याच्या सरकारच्या आदेशाला स्थगिती दिल्याने एका तासातच नगराध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया बारगळली. 
वाडी नगर परिषदेत मंगळवारी दुपारपर्यंत राजकीय डावपेच आखून नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांनी गटागटाने मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्याकडे अर्ज सादर केले. परंतु, पक्षांतर्गत नाराजी, बैठका, करार हे प्रारंभ होण्यापूर्वीच वाडीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांचे याचिकेवर नागपूर उच्च न्यायालयात सुनावणीनंतर पद बरखास्तीला स्थगिती मिळाल्याची बातमी येऊन धडकताच नगर परिषदेचे संपूर्ण निवडणुकीचे वातावरणातच बदलून गेले. प्रेम झाडे उद्या बुधवारी 11 वाजता नगराध्यक्षपदाची सूत्रे ग्रहण करणार असल्याची माहिती प्रत्यक्ष प्रेम झाडे यांनी दिली. 
प्रेम झाडे यांना अपात्र ठरविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नियमानुसार रिक्त जागेवर नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार मंगळवार सकाळीपासून अर्ज दाखल झाले होते. तिकडे न्यायालयात प्रेम झाडे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होत असतानाचा इकडे नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष कुणी व कुणाच्या गटाचा बनावा यासाठी चर्चा, नियोजन, दावे, प्रतिदावे सुरू होते. सोमवारी भाजपतर्फे कैलास मंथापुरवार, केशव बांद्रे यांनी उमेदवारी दाखल केली होती. तर प्रेम झाडे यांनी गट विकास आघाडी स्थापन करून त्यांच्या प्रमुख असलेल्या नीता अभय कुणावार यांची उमेदवारी अर्ज दाखल केला. बसप समर्थित अपक्ष आशीष नंदागवळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज दुपारनंतर चारच्या सुमारास न्यायालयीन निर्णयाची प्रेम झाडे यांच्या पदमुक्ती स्थगितीची बातमी पोहचताच पूर्ण वातावरण बदलून गेले. भाजप-सेना सदस्यांना या अनपेक्षित निर्णयाचे आश्‍चर्य वाटले तर विरोधी सदस्यांच्या नियोजला पूर्णविराम मिळाला. 
 
आघाडीत झाली बिघाडी 
चार वर्षांपूर्वी आमदार समीर मेघे यांच्या पुढाकाराने स्थापित वाडी नगरविकास आघाडीत बिघाड झाल्याने नगराध्यक्षपदाची माळ प्रेम झाडे यांच्या गळ्यात पडली होती. कालांतराने पक्षांतर्गत राजकीय विवाद व वर्चस्वाच्या संघर्षात नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. सोमवारी झालेल्या घडामोडीतून मात्र नगर विकास आघाडी व भाजपमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

भाजपमध्ये अंतर्गत वाद ठरला कारणीभूत 
वाडी नपच्या मूळ स्थितीनुसार भाजपचे नऊ, बसपचे सात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, शिवसेनेचे दोन, कॉंग्रेस व अपक्ष एक असे एकूण 25 सदस्य होते. वाडी नगर विकास आघाडीची मोट बांधून कॉंग्रेसच्या प्रतीक्षा पाटील यांना पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष तर अपक्ष राजेश थोराणे यांना उपाध्यक्ष पद मिळाले होते. करारानुसार प्रेम झाडे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. यानंतर भाजपमध्ये दोन गटाचा अंतर्गत विवाद उफाळून आला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com