सातदा झाले लग्न, आता पोलिसांना शोधवा लागतोय मुलाचा खरा बाप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

दीड महिन्यांपूर्वी तिची सुटका झाली आणि पोलिसांनी तिला चंद्रपुराला आणले. त्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी पोलिस तपासात समोर येत आहेत. तिची खरेदी आणि विक्री करणारी आणि उत्तरभारतात मानवी तस्करीचे रॅकेट चालविणारी सपना शुटर उर्फ युनिता टाक आधीच पोलिसांच्या हाती लागली आहे. तिला या कामात मदत करणारी तिची मुलगी निक्की टाक हिला हरियाणातील एका गावातून अटक केली. त्याला एपी एक्‍सप्रेसने दुपारी दोन वाजता आज गुरुवारला चंद्रपुरात आणले.

चंद्रपूर : सात लग्न, देहव्यापार यातून झालेली मूल नेमकी कुणाची आहे, याची पीडितेलाही माहिती नाही. या मुलांचा जन्मदाता कोण? याचा तपास आता पोलिस करणार आहे. त्यासाठी अटकेतील आरोपींची डीएनएन चाचणी करण्याची परवानी पोलिस न्यायालयाकडे मागणार आहे. दरम्यान मानवी तस्करी प्रकरणात आणखी दोन आरोपींना हरिणायातून अटक केली. त्यांना आज (ता. 6) रेल्वेने चंद्रपुरात आणले. आता आरोपींची संख्या दहा झाली. चंद्रपूर पोलिसांचे एक पथक हरिणायात आरोपींच्या शोधात तळ ठोकून आहे.

चार जून 2010 रोजी येथील बंगाली कॅम्प परिसरातील काली माता मंदिरातून प्रसादात गुंगीचे औषध देवून कविता (नाव बदलले ) दहा वर्षीय मुलीला रेल्वे हरिणायात नेले होते. तिथे तिची पंधरा हजारात विक्री केली. मागील दहा वर्षात तिचे सात लग्न लावून देण्यात आले. ती 13 वर्षाची असताना मुलगी आणि 14 वर्षाची असताना तिला मुलगा झाला.

आरोपींची डीएनए चाचणी होणार!
दीड महिन्यांपूर्वी तिची सुटका झाली आणि पोलिसांनी तिला चंद्रपुराला आणले. त्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी पोलिस तपासात समोर येत आहेत. तिची खरेदी आणि विक्री करणारी आणि उत्तरभारतात मानवी तस्करीचे रॅकेट चालविणारी सपना शुटर उर्फ युनिता टाक आधीच पोलिसांच्या हाती लागली आहे. तिला या कामात मदत करणारी तिची मुलगी निक्की टाक हिला हरियाणातील एका गावातून अटक केली. त्याला एपी एक्‍सप्रेसने दुपारी दोन वाजता आज गुरुवारला चंद्रपुरात आणले.

- ज्याच्यावर होती पालन-पोषण करण्याची जबाबदारी, त्यानेच ओलांडली सीमा

आणखी दोन आरोपींना हरियाणातून अटक
सपनाचा मुलगा विक्कीलाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यालाही रात्री उशिरापर्यंत चंद्रपुरात आणले जाणार आहे. या तिघांच्या अटकेने बेपत्ता मुलींचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता आहे. अटकेतील आरोंपीनी चंद्रपुरातील 20 मुली विकल्याची कबुली दिली आहे.

मानवी तस्करीप्रकरण
तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी हरियाणातील फतेबाद येथून धर्मवारी शोरान (वय 35), कृष्णा शोराना (30) आणि कमलादेवी शोरान (वय 52) यांना अटक केली. ते सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यांचा भाऊ राकेशकुमार शोरान आणि मित्र जयसिंगच्या शोधात पोलिस आहे.

- महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला साथ देण्यास तयार

सन 2012 ते 2018 पर्यंत पीडिता यांच्याच ताब्यात होती. पीडितेला सपनाने शोरान बंधूंना दीड लाख रूपयात सपनाने याकाळात शोरान बंधूसह अनेकांनी तिच्या देहाची चाळणी केली. यातूनच तिला दोन मुल झाली. त्या मुलांचा बाप कोण हे पीडितेला माहित नाही. त्यामुळे आता शोरान बंधू आणि इतर आरोपींच्या डीएनए चाचणीची मागणी पोलिस न्यायालयाकडे करणार आहे. सध्या ही दोन्ही मुल नेमकी कुठे आहे, याची माहिती पीडितेला आणि पोलिसांनाही नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: human traficking case news chandrapur