यवतमाळातील शंभरावर गावे पितात फ्लोराइडयुक्त पाणी

file photo
file photo

यवतमाळ : जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शासनातर्फे लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील जिल्ह्यातील 193 गावातील नागरिकांना फ्लोराइडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. फ्लोराइडयुक्त पाणी पिण्यामुळे जनतेला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यातील 193 गावांतील 301 जलस्रोतांमधून फ्लोराइडयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची नोंद जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे. याशिवाय काही गावे रेडकॉर्डमध्ये असल्याचेसुद्धा सांगण्यात आले. या जलस्रोतांसंदर्भात योग्य उपाययोजना करण्यात यावी, याकरिता शासनातर्फे लाखो रुपये खर्चसुद्धा केला जातो. या गावांतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, याकरिता जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार जिल्हा परिषदेच्या सर्वसर्वसाधारण सभेत मुद्दादेखील उपस्थित केला आहे. मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. आजच्या घडीला जिल्ह्यातील 193 गावांत 301 जलस्रोतांमधून फ्लोराइडयुक्त पाणी येत असल्याची माहिती आहे. त्यात आर्णी तालुक्‍यातील 15 गावांमधील 17 जलस्रोतांमधून हे पाणी येते. त्याचबरोबर बाभूळगाव तालुक्‍यातील सहा गावांमधील नऊ स्रोत, दारव्हा तालुक्‍यातील सहा गावांतील सहा स्रोत, घाटंजी तालुक्‍यातील 34 गावांमधील 52 स्रोत, कळंबच्या सात गावांतील 10 स्रोत, पांढरकवडा तालुक्‍यातील 40 गावांतील 61 स्रोत, मारेगाव तालुक्‍यातील एका गावातील तीन स्रोत, नेरमधील एका गावातील एक स्रोत, पुसदमधील एक स्रोत, वणी तालुक्‍यातील 24 गावांतील 51 स्रोत, यवतमाळ सात गावांतील 12 स्रोत, झरी जामणी 14 गावांतील 25 स्रोत असल्याची नोंद शासनदफ्तरी आहे. या जलस्रोतांवर योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यातील काही गावांत फ्लोराइडयुक्त पाणी असल्याचे स्रोत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याकरिता शासनातर्फे यंत्र बसविण्यात आले. ज्या गावात यंत्र बसविण्यात आले नाही. त्या ठिकाणीसुद्धा लवकरच यंत्र बसविण्यात येईल.
- जलज शर्मा,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com