...आणि गेला त्या सांबराचा जीव! वाचा नेमके काय झाले

sambar
sambar
Updated on

मूल (जि. चंद्रपूर) : बफर झोन अंतर्गत येणा-या फुलझरी क्षेत्रात एका सांबराची शिकार झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पाच मुख्य आरोपींसह इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या शिकार प्रकरणाने वनविभागात आणि स्थानिक फुलझरी गावात खळबळ उडाली आहे. ही घटना कक्ष क्र.३५९ मध्ये घडली. दरम्यान आरोपींकडून तीन किलो मांस , सत्तूर आणि खोडके जप्त करण्यात आले आहे.

मूल बफर झोन वनपरिक्षेत्राअंतर्गंत येणा-या फुलझरी या गावात सांबराची शिकार झाल्याची गुप्त माहिती भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेला मिळाली. त्यानुसार त्यांनी फुलझरी येथील देवीदास सोयाम या इसमाला रात्री ताब्यात घेतले. वनविभागाने त्याची चौकशी केली असता त्याने इतर आरोपींची नावे सांगितली. वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार ,फुलझरी गावाशेजारी असलेल्या वनालगत रानकुत्र्यांनी सांबराची शिकार केली होती. यावेळी आरोपी तलावाजवळ मासेमारी करीत होते .त्यांना ही घटना दिसली. त्यांनी या सांबराची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. त्यांनी वनातच सांबराला कापले आणि त्याचे मांस गावातील काही लोकांना वाटले. शेवटी याचे बिंग फुटल्याने शिकारीची माहिती समोर आली.

सर्व आरोपींनी शिकारीची कबुली दिली असून सांबराचे तीन किलो मांस ,कापण्यासाठी वापरण्यात आलेले सत्तूर, खोडके सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

शिकार प्रकरणात देवीदास किसन सोयाम,जयपाल सिडाम,रोशन सिडाम,शुभम आत्राम,अविनाश मडावी सर्व राहणार फुलझरी याच्यासह इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी गुंतले असल्याने पुढील तपास बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी एस जे बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक कोसरे ,फुलझरी येथील वनरक्षक मडावी ,विशेष व्याघ्र संरक्षण दल करीत आहे.

दरम्यान मूल येथे वरिष्ठ अधिका-यांनी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली.
मूल तालुक्याला बफर झोनचा मोठा भाग लाभला आहे. यात पट्टेदार वाघ, बिबटसह इतर वन्यप्राण्यांचा संचार आहे. जंगलाशेजारी गावे लागून असल्याने मानव आणि वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच भाग ठरला आहे. त्यामुळे यातून उद्भवलेल्या प्रश्नांमुळे वनालगत शिकारीच्या घटना नेहमीच घडत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com