esakal | मांगुर्ला जंगलात वाघिणीची हत्या; यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील घटना

बोलून बातमी शोधा

मांगुर्ला जंगलात वाघिणीची हत्या; यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील घटना
मांगुर्ला जंगलात वाघिणीची हत्या; यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : चार वर्षे वयाच्या वाघाची हत्या करून त्याला जाळून टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकुटबन वनपरिक्षेत्रात काल, रविवारी (ता. 25) रोजी घडली. तर, याच आठवड्यात टिपेश्‍वर अभयारण्यात एका वाघाच्या पायाला तारेचा फास अडकून जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे जिल्ह्यातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: उपराजधानीत वाढले वकिलांच्या मृत्यूचे प्रमाण; कोरोनाने महिन्याभरात १५ मृत्यू

पांढरकवडा वनविभागअंतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्र. 30 मध्ये वन्यप्राणी वाघ मृत झाल्याची माहिती रविवारी (ता. 25) सकाळी 10.30 वाजता मिळाली. सदर माहितीच्या आधारे सुभाष पुराणिक, विभागीय वनअधिकारी (वन्यजीव), पांढरकवडा, व्ही. जी. वारे, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुटबन, प्रकाश महाजन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म. रा., नागपूर यांचे प्रतिनिधी तसेच डॉ. रमजान विराणी, मानद वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण दिल्ली यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट दिली व वस्तुस्थितीची पाहणी केली.

सदर जागेची तपासणी केली असता वाघ नाल्याला लागून असलेल्या गुहेत मृतावस्थेत आढळून आला. गळ्यात तारेचा फास अडकल्याचे, अणकुचीदार हत्याराने त्याच्यावर वार केल्याचे व गुहेच्या तोंडाशी लाकडांनी आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मृत वाघाची तपासणी केली असता तो वाघ मादी वाघ असून अंदाजे 4 वर्षे वयाची असण्याची शक्यता आहे. वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडून नेल्याचे पंचनाम्यात दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर, डॉ. अरुण जाधव, वणी, डॉ. एस. एस. चव्हाण, झरी, डॉ. डी. जी. जाधव, मुकुटबन व डॉ. व्ही. सी. जागडे, मारेगाव यांचे मार्फत मोक्यावर शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा: नशा करण्यासाठी पितात सॅनिटायझर; मद्यपींचा अजब पर्याय जीवघेणा; वणीतील घटनेने पोलखोल

सदर मृत वाघिणीचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. सदर प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा जारी करून गुन्ह्याचा तपास सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा), पांढरकवडा हे करीत आहेत.

उपवनसंरक्षक, पांढरकवडा वनविभाग, पांढरकवडा.