

Accident
sakal
वणी - नातेवाइकाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या दांपत्यावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला शिदोला मार्गावर विरुद्ध दिशेने येणार्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीची चंद्रपूर येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.