esakal | लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा थरार! पतीनं बोलून दाखवली फिरायला जाण्याची इच्छा; पत्नीनं नाही म्हणताच...  
sakal

बोलून बातमी शोधा

याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद माधव आत्राम (वय 28) असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे.

याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद माधव आत्राम (वय 28) असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा थरार! पतीनं बोलून दाखवली फिरायला जाण्याची इच्छा; पत्नीनं नाही म्हणताच...  

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंद्रपूर : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीने नवविवाहित पत्नीवर ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्‍यातील लोणवाही येथील राजीव गांधी कॉलनीत घडली. बाहेर फिरायला न गेल्याच्या कारणातून पतीने हे कृत्य केल्याचे म्हटले जाते. 

हेही वाचा - घटस्फोटीत महिला झाली तीन महिन्यांची गर्भवती; प्रियकराचं सत्य समोर येताच उचललं कठोर पाऊल 

याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद माधव आत्राम (वय 28) असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे.

सिंदेवाही तालुक्‍यातील लोनवाही येथील एका मुलीचे चिमूर तालुक्‍यातील पसरगाव येथील प्रमोद आत्राम याच्याशी 15 मार्चला लग्न झाले. दुसऱ्या दिवशी ती आपल्या पतीसह लोणवाहीला माहेरी आली. मुलगी, जावई आल्याने कुटुंबीय आनंदी होते. अशात प्रमोदने पत्नीजवळ बाहेर फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, लग्नाचा दुसराच दिवस असल्याने बाहेर फिरायला जाण्यास तिने नकार दिला. 

नक्की वाचा - आजपासून चौदा उड्डाणपूल बंद, दुपारी १ नंतर मिळणार 'प्रसाद'

त्यामुळे संतापलेल्या प्रमोदने पत्नीवर ब्लेडने हल्ला केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. या घटनेची तक्रार सिंदेवाही पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद आत्राम याला अटक करून गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.