आजपासून चौदा उड्डाणपूल बंद, दुपारी १ नंतर मिळणार 'प्रसाद'

14 fly over closed for travelling due to lockdown in nagpur
14 fly over closed for travelling due to lockdown in nagpur

नागपूर : लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी प्रशासनाने नागरिकांना थोडी सवलत दिली. नागरिक विनाकारण रस्‍त्यांवर फिरत असताना आढळले. मंगळवारीही नागरिक लॉकडाउनला गांभिर्याने घेत नसल्याने महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील चौदा उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय घेतला असून दुपारी एकनंतर रस्‍त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना आता पोलिस 'प्रसाद' देणार आहेत. 

काही उनाड युवक पोलिसांना चिडविण्याचे काम करीत आहेत. पोलिस तैनात नसल्याने काही जण थेट खालच्या रस्त्‍याने न जाता थेट उड्डाणपुलांवरून वाहने सुसाट चालवत पोबारा करीत आहेत. यावर उपाय म्हणून उद्यापासून शहरातील १७ पैकी १४ उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक दुकानांची वेळ दुपारी एक वाजेपर्यंत निश्चित केल्याने पोलिस बंदोबस्तात मोठा बदल करण्यात आला आहे. नाकाबंदीची संख्या वाढविण्यात आली असून पोलिस कर्मचारी आता दंडुक्यासह रस्त्यावर दिसणार आहेत. कुणीही विनाकारण रस्त्यावर दिसल्यास त्याला पोलिसांचा 'प्रसाद' देण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिला. 

दारूच्या तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव -
मद्यविक्री करताना करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारूच्या तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. 

टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा, उद्योग, बांधकाम क्षेत्र व खासगी कार्यालयांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. पण, या सेवांच्या नावाखालीही काहीजण अतिरेक करीत असल्याने कारवाईचा प्रभाव वाढवण्यात आला. मंगळवारी प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एचडीएफसी फायनान्स आणि सिंधी हिंदी शाळेच्या परिसराची पाहणी केली. आता खासगी कार्यालयांची झाडाझडती करण्यात येईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com