झोपेत असताना घराला लागली आग; पत्नीला ही बाब समजली, मात्र दुसऱ्या खोलीत असलेल्या पतीचा होरपळून मृत्यू

Husband dies in fire and The wife safe yavatmal crime news
Husband dies in fire and The wife safe yavatmal crime news

पुसद (जि. यवतमाळ) : येथील ज्ञानेश्वर मंदिरालगतच्या परिसरातील एका घराला अचानक आग लागून घरात झोपून असलेल्या घरमालकाचा मृत्यू झाला. अरुण केशरचंद नरसिंग (वय ६१) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी विद्या नरसिंग या सुदैवाने बचावल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या गावात ज्ञानेश्वर मंदिर परिसरात अरुण नरसिंग यांचे घर आहे. घरात पती-पत्नी राहत होते. सकाळी चारच्या दरम्यान घराला आग लागल्याने पत्नी विद्या यांना जाग आली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र, त्यांचे पती ज्या खोलीत झोपलेले होते ती आगीने वेढली गेली. आगीत पती अरुण यांचा होरपळून मृत्यू झाला.

काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली व आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत घरातील सामान भस्मसात झाले. घराला आग लागल्याचे दिसताच नगरपालिकेच्या दलाला पाचारण करून शेजारी रूपेश अग्रवाल, संदीप आहाळे, संतोष आहाळे, अनिकेत आहाळे, शैलेश आहाळे, अनिकेत आहाळे, शैलेश आहाळे, निखिल नरसिंग यांनी सतर्कता बाळगून आग विझविण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक पांडुरंग फाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत अरुण नरसिंग यांना अपत्य नव्हते. ते पंधरा दिवसांपासून उपवास करीत होते.

आगीत लाखोंचे नुकसान

पुसद रोडवरील यूपीपी कॉलनीच्या बाजूला असलेल्या फोम गाद्या आणि पिलो बनविणाऱ्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हुतात्मा स्मारकाच्या समोर असलेल्या गजानन चव्हाण यांच्या कॉम्प्लेक्‍समधील एकनाथ जाधव यांच्या सिद्धिविनायक ग्रुप या दुकानाला आग लागली.

यावेळी दुकानात कामगार हजर होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला. आगीत चार लाखाच्या मशिनरी व सोळा लाखांचा कच्चामाल असा एकूण २० लाखांचा माल जळून खाक झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com