esakal | साथीदारांच्या मदतीने पतीला संपविले, धरणात फेकला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

Husband killed with the help of friend, body thrown into the dam

पूस धरणाच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली होती. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता मृतकाच्या अंगावर तीक्ष्ण वार दिसून आले.

साथीदारांच्या मदतीने पतीला संपविले, धरणात फेकला मृतदेह

sakal_logo
By
कैलास जगताप

पुसद (जि. यवतमाळ)  : धारदार शस्त्राने पोटावर व छातीवर वार असलेला मृतदेह पूस धरणातील पात्रात आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. प्रियकरासह साथीदारांच्या मदतीने पतीला संपविल्याचे तपासात समोर आले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी (ता.21 ) सकाळच्या दरम्यान पूस धरणाच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली होती. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता मृतकाच्या अंगावर तीक्ष्ण वार दिसून आले. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आले होते. मृतकाची ओळख पटवणे व आरोपींचा छडा लावणे अशी दुहेरी जबाबदारी पोलिसांवर होती.

 मन सुन्न! चुली पेटल्याचं नाहीत; गावातील मुलांच्या बाबतीत घडलेली हृदयद्रावक घटना बघून हळहळले अख्खे गाव

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन यासाठी पथक नेमले. या पथकाला घटनेच्या दुसऱ्या दिवशी मृतक हा तालुक्‍यातील घाटोडी येथील रहिवासी असून, त्याचे नाव गोविंद प्रल्हाद बळी असल्याचे समजले. अधिक तपास पोलिसांनी केला असता सदर खून हा मृतकाची पहिली पत्नी पूजा, तिचा प्रियकर चेतन कैलास डंगोरिया व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याचे तपासात आढळून आले.

आरोपींच्या साथीदारांमध्ये सचिन हराळ, राजेश पवार, शेख शाकीर शेख रउफ व महेश उर्फ रामबहादूर रावल (सर्व रा. शिवाजी वार्ड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय चोबे करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलिस कर्मचारी मुन्ना आडे, गोपालवास्टर आदींनी केली.

संपादन : अतुल मांगे 

loading image
go to top