हातपाय बांधून पत्नीचा खून

संतोष ताकपिरे
Monday, 10 August 2020

वीणा भीमसिंग मंडलोई (वय ३०, रा. राणीगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मृत महिलेचा पती भिमसिंग प्यारासिंग मंडलोई (वय ३६,रा. राणीगाव) विरुद्ध रविवारी (ता. नऊ) रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

अमरावती : पत्नी सोबत संसार करायला तयार नसल्यामुळे चिडलेल्या पतीने राणीगाव येथील जंगलात नेऊन पत्नीचे हातपाय बांधून साडीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर त्याने मध्यप्रदेश येथील नेपानगर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

वीणा भीमसिंग मंडलोई (वय ३०, रा. राणीगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मृत महिलेचा पती भिमसिंग प्यारासिंग मंडलोई (वय ३६,रा. राणीगाव) विरुद्ध रविवारी (ता. नऊ) रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. असे पोलिस उपनिरीक्षक श्री. चापले यांनी सांगितले.

मध्यप्रदेशच्या माजगाव येथील भीमसिंग याचा पत्नी वीणा सोबत कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. त्यामुळे जवळपास एक वर्षापासून पत्नी वीणा ही पतीसोबत न राहता वेगळी राहात होती. पत्नीने आपल्यासोबत राहावे यासाठी भीमसिंग पुन्हा रविवारी (ता. नऊ) सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास पत्नी वीणा हिला घेऊन जिल्ह्यातील मोथाखेडा येथे राहणा-या आपल्या भाचीकडे आला. त्यांच्यात चर्चा झाली. पत्नीने सोबत राहण्यास पुन्हा नकार दिल्याने त्यांच्यात भाचीच्या घरीच वाद झाला.

भीमसिंगने फिरायला जाण्याच्या बहाण्याने पत्नी वीणाला दुचाकीवर बसवून राणीगाव येथून जंगलाच्या दिशेने नेले. चिडलेल्या भीमसिंगने पत्नीचे दोन्ही हातपाय बांधून तिच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यापासून वीस ते पंचवीस फुट अंतरावर झुडपात फेकून दिला.

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

त्यानंतर त्याने थेट मध्यप्रदेश येथील नेपानगर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांना सांगितले. घटनास्थळ धारणी हद्दीत असल्याने मध्यप्रदेश पोलिसांनी धारणी पोलिसांशी संपर्क साधला. रवींद्र वऱ्हाडे, सुहास डहाके, बाळापुरे या तीन कर्मचा-यांचे पथक ७२ किलोमीटर अंतरावरील नेपानगर येथे गेले. मध्यप्रदेश पोलिसांकडून भीमासिंगला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. धारणी येथे आणून त्याचे बयाण नोंदविले असता, भीमासिंगने पत्नीच्या खुनाची कबुली धारणी पोलिसांपुढे दिली.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband killed his wife