मद्यपीने मंदिरातील विठ्ठल रुखमाईची मूर्ती काढून नदीत शिरवली

बादल वाणकर
Friday, 21 August 2020

वॉर्ड क्रमांक एक नगर पंचायतच्या मागील बाजूस संस्कार ज्ञानपीठच्या बाजूला महिला मंडळाने छोटे विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. याच वॉर्डातील युवक दारू पिऊन आला व मंदिरातील मूर्ती काढून नदीमध्ये नेऊन शिरवली. वॉर्डातील नागरिकांना माहिती मिळताच सर्व नागरिक गोळा होऊ लागले व मोठी गर्दी जमा झाली.

समुद्रपूर (जि. वर्धा) : नगर पंचायतच्या मागील बाजूला असलेल्या विठ्ठल रुखमाई मंदिराच्या जवळच राहणाऱ्या मद्यपीने मूर्ती काढून नदीत शिरवली. ही घटना आज उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक एक नगर पंचायतच्या मागील बाजूस संस्कार ज्ञानपीठच्या बाजूला महिला मंडळाने छोटे विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. याच वॉर्डातील युवक दारू पिऊन आला व मंदिरातील मूर्ती काढून नदीमध्ये नेऊन शिरवली. वॉर्डातील नागरिकांना माहिती मिळताच सर्व नागरिक गोळा होऊ लागले व मोठी गर्दी जमा झाली.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार हेमंत चांदेवार, तहसीलदार राजू रणवीर, नगराध्यक्ष गजानन राऊत, नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वलिया मालेगाव, प्रशासकीय अधिकारी धुमाळे घटनास्थळी उपस्थित होते. याबाबत कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने पोलिसांकडून प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मूर्तीची कोणतीही विटंबना नाही
मूर्तीची कोणतीही विटंबना झाली नाही. मद्यपीने ती मूर्ती काढून नदीमध्ये शिरवली. या संदर्भात कुणीही तक्रार देण्यास तयार नसल्याने आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहो.
- हेमंत चांदेवार,
ठाणेदार, पोलिस स्टेशन, समुद्रपूर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the idol was thrown into the river by a drunkard In Wardha