Video : विदर्भात पहिल्यांदाच होतोय इज्तेमा उत्सव.... वाचा याबद्दल 

Amravati program
Amravati program

अमरावती : अंबानगरीत होऊ घातलेल्या इज्तेमा उत्सवात संपूर्ण देशभरातून लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. विदर्भात हा उत्सव पहिल्यांदाच होत असल्याने नांदगावपेठजवळ या उत्सवाची भव्यता लक्षात येत आहे. शनिवारी (ता. 7) सकाळी दहा वाजतापासून उत्सवाला सुरुवात झाली. 1100 एकर जागेत 40 लाख चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. सोमवरा (ता. 9)पर्यंत हा उत्सव चालेल. दरम्यान, सोमवारी (ता. 9) सकाळी 500 उपवर-वधूंचा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.

मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण 
दिल्लीस्थित मरकज हजरत निजामोद्दीन येथून 70 धर्मगुरू उत्सवात सहभागी झाले आहेत. या उत्सवात मुस्लिम बांधवांना कुराण शरीफची माहिती धर्मगुरू देतील. विदर्भात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आलमी इज्तेमाचे आयोजन करण्यात आल्याने शहरासह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

इज्तेमागाह आयोजित होणारे ठिकाण पवित्र समजले जाते. त्याबाबत मुस्लिम धर्मात दाखले असल्याचेही सांगण्यात येते. मात्र इज्तेमागाह तथा कार्यक्रमादरम्यान माती उचलणे शक्‍य होणार नाही, म्हणून काही महिला इज्तेमागाहवरील पवित्र माती आतापासून संकलित करीत आहेत. कार्यक्रम झाल्यावर इज्तेमागाहची किमान चिमूटभर माती मुस्लिम बांधव स्वतःसोबत नेतात. ज्या जमिनीवर लाखो समाजबांधवांनी प्रार्थना व नमाज अदा केली आहे, ती जमीन पवित्र झालेली असते.

चोख बंदोबस्त 
इज्तेमादरम्यान संपूर्ण परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात चार डीसीपी, तीन इतर जिल्ह्यातील डीसीपी, सात एसीपी, 18 पीआय, 45 पीएसआय, 1300 कर्मचारी, एसआरपीएफच्या दोन तुकड्या, 500 होमगार्ड, 50 वॉकीटॉकी, 4 डोअरवेटर डिटेक्‍टर व बॉम्बस्कॉड तसेच 6 सदस्यीय चमू सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. बाहेर राज्यातूनसुद्धा पोलिस दल बोलाविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com