
कामठी : तालुक्यात सध्या अवैध कोळसा डम्पिंग यार्डचे जाळे पसरले असून, लिहिगाव, कापसी (बु.), कापसी (खु.), महालगाव, आसोली, गुंमथाळा, भोवरी, कढोली, दिघोरी, नेरी, गादा आणि सावळी या परिसरात बिनपरवाना कोळशाचा व्यापार झपाट्याने वाढला आहे. खाणींमधून निघणारा कोळसा थेट अवैध टालांमध्ये पोहचतो असून यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा स्थानिक ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी घेतली नाही.