Illegal Seeds : बंदी असलेलं २० लाखांचं बियाणं जप्त; मूर्तिजापूरात मोठी कारवाई
Agriculture Crime : मूर्तिजापूर येथे एचटीबीटी कपाशीचे बेकायदेशीर व प्रतिबंधित बियाणे हस्तांतरित करताना पोलिसांनी २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राष्ट्रीय महामार्गाजवळ एका वाहनातून दुसऱ्यात पोती भरताना ही कारवाई करण्यात आली.
मूर्तिजापूर : राज्यासह देशभरात प्रतिबंधित असलेले २० लाखांचे बियाणे शुक्रवारी पोलिसांनी जप्त केले. एचटीबीटी कपाशी बियाण्याच्या पोते एका वाहनातून दुसऱ्या वाहनात भरत असताना ही कारवाई करण्यात आली.