हवामान विभागाच्या नजरेत विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र; तापमानाच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा; महाराष्ट्राला दाखवले वेगळे

IMD Heatwave Post Sparks Debate : या पोस्टमध्ये देशात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या २७ शहरांची माहिती दिलेली आहे. पण, महाराष्ट्रातील शहरांच्या नावापुढे विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्र असे प्रदेशनिहाय स्वतंत्र उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
IMD Heatwave Post Sparks Debate

IMD Heatwave Post Sparks Debate

esakal

Updated on

अमोल राऊत :

एकीकडे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाने चाळीशी ओलांडलेली असताना भारतीय हवामान विभागाने केलेल्या तापमानवाढीच्या त्या पोस्टने चर्चेचा ‘पारा’ चढला आहे. या पोस्टमध्ये देशात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या २७ शहरांची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये १४ शहरे महाराष्ट्रातील आहेत. मात्र, महाराष्ट्रातील शहरांच्या नावापुढे विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्र असे प्रदेशनिहाय स्वतंत्र उल्लेख केल्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्राचे विभाजन केले, असा प्रश्न समाजमाध्यमावर विचारला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com