लाॅकडाउन 4.0 बाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणेंनी दिल्या ह्या महत्त्वपूर्ण सूचना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

आता जिल्ह्याबाहेरून कोरोना जिल्ह्यात येत असल्यामुळे चहूबाजूंनी सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी जिल्ह्यात बाहेर गावावरून येणाऱ्यांमुळे धोका वाढत आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर बऱ्हाणपूर येथून जळगाव जामोदला व मुंबईवरून मलकापूर पांग्राला पेशंट आढळून आला. त्यामुळे आता जिल्ह्याबाहेरून कोरोना जिल्ह्यात येत असल्यामुळे चहूबाजूंनी सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज (ता.16) दुपारी पालकमंत्री डाॅ. शिंगणे यांनी तातडीच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी आर. जी. पुरी, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - वाह! याला म्हणतात वेळेचा सदुपयोग, तो पण चक्क शाळेत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींकडून...वाचा

बुलडाणा जिल्ह्याने कोरोना परिस्थिती आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे हाताळली व जिल्हा यातून मुक्तही झाला, मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यात कोरोनामुळे त्या जिल्ह्यांमधून बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आवश्यक वाचा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी; नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

तसेच जिल्हाअंतर्गत सध्या अनेक बाबतीत ढील दिल्याचे दिसत आहे, त्यावरही नियंत्रण आणण्याचे गरजेचे असल्याचे डाॅ. शिंगणे म्हणाले. उद्यापासून चौथ्या टप्प्याचे लॉकडाउन सुरू होत असून त्याचीही अंमलबजावणी शासन निर्देशाप्रमाणे झालीच पाहिजे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important instructions given by minister Dr. Rajendra Shingane regarding Lockdown 4.0