'तिच्या' नशिबी यातनाच; हुंड्यासाठी सासरच्यांनी दिलं पेटवून; आईची तक्रार

crime
crime
Updated on: 

नागभीड (जि. चंद्रपूर) : सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीला जाळले. त्यात तिचा मृत्यू झाला, असा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे. यासंदर्भात नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तालुक्‍यातील मेंढा येथील लक्ष्मण कोरे यांच्या मुलीचे लग्न 22 फेब्रुवारीला तालुक्‍यातील डोंगरगाव येथील महेश विनायक हेमने यांच्याशी रितीरिवाजानुसार झाले. सुखी संसाराचे स्वप्न रंगवीत असताना कोरे यांची मुलगी जळाल्याची घटना घडली. उपचारादरम्यान तिचा नागपूर येथे मृत्यू झाला.

हेही वाचा - मैत्रिणीला फिरायला घेऊन जाणं पडलं महाग, तब्बल ६ लाखांचा गंडा

अवघ्या एका महिन्यांत तिच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. या घटनेनंतर मृत मुलीच्या आईने डोंगरगाव गाठून पाहणी केली. तेव्हा तेथे अनेक बाबी संशयास्पद आढळून आल्या. त्यामुळे 28 मार्चला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीला जाळून ठार केल्याची तक्रार दाखल केली.

हुंड्याचे पैसे आणि कर्ज भरण्यासाठी अतिरिक्त 50 हजार रुपये माहेरून आणण्यासाठी मुलीला सासू प्रमिला विनायक हेमने व नणंद नाशिका भेंडारकर या नेहमी त्रास देत होत्या. एवढे नाही, तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळीनी मुलीला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी पती महेश विनायक हेमने, सासू प्रमिला विनायक हेमने, नणंद नाशिका भेंडारकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी मुलीला हुंड्यासाठी जाळून टाकणाऱ्यांना तातडीने अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - पालकांनो सावधान..! तुमचाही मुलगा मोबाईल गेम खेळत नाही ना?

मृत मुलीच्या आईच्या तक्रारीची दखल घेतली आहे. सासरच्या मंडळीविरोधात गुन्हासुद्धा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून, पोलिस अटकेसाठी त्यांच्या मागावर आहेत.
- प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक, नागभीड

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com