esakal | मास्टर ब्लास्टर तेंडुलकर कुटुंबीयासह ताडोबात
sakal

बोलून बातमी शोधा

sachin tendulakr

मास्टर ब्लास्टर तेंडुलकर कुटुंबीयासह ताडोबात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंद्रपूर: वाघांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, पत्नी अंजली आणि निवडक मित्रांसोबत दाखल झाला. शनिवारी (ता. ४) दुपारी दोन वाजता तेंडुलकर कुटुंबीयांचे आगमन झाले.

हेही वाचा: समृद्धी महामार्गाचा प्रवास विमानापेक्षा महाग?;पाहा व्हिडिओ

मास्टर ब्लास्टर अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी मोहित केले आहे. त्यामुळेच तेंडूलकर दरवर्षी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहकुटूंब व मित्रांसोबत जंगल सफारीसाठी येतो. शनिवारी सकाळी त्याचे पत्नी अंजलीसह नागपूर विमानतळावर आगमन झाले. चिमूरमार्गे तेंडुलकर कुटुंबीय ताडोबातील कोलारा प्रवेशव्दाराने बांबू रिसोर्ट येथे दाखल झाले. दुपार बफरची सफारी त्यांनी केली.

मागीलवर्षी मास्टर ब्लास्टर आपल्या कुटुंबीयासह ताडोबा आला होता. तेव्हा तेंडुलकर कुटुंबीयांना अलीझंझा, बेलारा व मदनापूर या तीन प्रवेशव्दाराने जंगल सफारी करताना वाघांचे दर्शन झाले होते. तेव्हा कोलारा प्रवेशव्दार येथे रिसोर्टमध्ये मुक्कामी होता. त्यानंतर शनिवारी मदनापूर प्रवेशव्दाराने दुपारी चार वाजता सफारीसाठी गेले.

सचिन सलग तीन दिवस ताडोबात मुक्कामी राहणार आहे, या काळात ताडोबातील बफर क्षेत्रात जंगल सफारीचा आनंद लुटणार असल्याची माहिती आहे. आज दुपारच्या सुमारास सफारीसाठी जात असतांना अनेकांनी छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वांना त्याने स्पष्ट शब्दात छायाचित्र घेवू नका असे सांगितले.

loading image
go to top