

Half Built Highway Becomes a Death Trap as Road Accidents Continue and Commuters Face Serious Safety Risks
sakal
आर्णी (जि. यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील दत्तरामपूर परिसर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. अर्धवट रस्त्यामुळे येथे अपघातांची मालिका सातत्याने सुरू असून, एकेकाळी दत्तरामपूर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण आता अपघातांचे केंद्र बनले आहे. नागपूर-तुळजापूर महामार्ग विदर्भातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात.