esakal | डॉक्‍टर, रुग्ण यांच्यात संवाद वाढावा डॉ. मुखर्जी
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्‍टर, रुग्ण यांच्यात संवाद वाढावा  डॉ. मुखर्जी

डॉक्‍टर, रुग्ण यांच्यात संवाद वाढावा डॉ. मुखर्जी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : अलीकडे डॉक्‍टरांवर हल्ले वाढले आहेत. याची कारणे शोधावी तसेच डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद वाढावा यासाठी डॉक्‍टरांनीच पुढाकार घ्यावा. प्रत्येक वेळी पोलिस मदतीला धावतील ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा हल्ला होणार नाही, असे प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी शाखेत सुवर्णपदकावर नाव कोरलेल्या विद्यार्थ्यांचा ऍल्युमिनाय असोसिएशनतर्फे मेडिकलमध्ये गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. मुखर्जी यांनी ही माहिती दिली. व्यासपीठावर मेडिकलचे माजी विद्यार्थी आणि सैन्य दलात मेजर जनरल राहिलेले डॉ. माधव तुताकने, माजी अधिष्ठाता आणि पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, ऍल्युमिनाय असोसिएशनच्या सचिव डॉ. विभावरी दाणी, डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. मनिष श्रीगीरीवार, डॉ. मीना मिश्रा उपस्थित होते.
loading image
go to top