Coronavirus : लेडी हार्डिंगचा धोका वाढलाय; प्रसूत झालेली महिला निघाली पॉझिटिव्ह

corona-agencies.jpg
corona-agencies.jpg

अकोला  : जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. कारण दोन दिवसात दोन प्रसूत झालेल्या महिला पॉझिटिव्ह आढळल्याने आता जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोनाचा धोका अधिक घडत होत आहे.

गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात एक महिला लेडी हार्डिंग संदर्भित महिला होती. ती नुकतीच प्रसूत झाल्यानंतर तिचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. अशातच आता शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा एक प्रसूत झालेली महिला पॉझिटिव्ह आढळली आहे.

दोन दिवसात दोन महिला पॉझिटिव्ह आढळल्याने लेडी हार्डिंगचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांच्या आजूबाजूला असलेल्या बेडवरील गर्भवती महिला तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आता त्या महिलांचे अहवाल कसे येतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही बाळ त्यांच्या माते सोबतच
जिल्हा स्त्री रुग्णालय यांनी दिलेल्या माहितीनुसार आढळलेल्या पॉझिटिव महिलांचे दोन्ही नवजात बाळ त्यांच्यासोबत असून आवश्यकतेनुसार त्यांना स्तनपान केले जात आहे. दोन्ही बाळांचे प्रकृती स्थिर असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

प्रत्येकाची केली जाते तपासणी
जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गर्भवती महिलांची तपासणी केली जात आहे. या तपासणीच्या माध्यमातूनच गर्भवती महिला किंवा प्रसूत झालेल्या महिला पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com