मुरंगल गावात पहिल्यांदाच झेंडावंदन; नक्षल स्मारक जाळून स्वातंत्र्यदिन

मुरंगल गावात पहिल्यांदाच झेंडावंदन; नक्षल स्मारक जाळून स्वातंत्र्यदिन

गडचिरोली : आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांच्या निवारणासाठी कार्यरत नागपूर येथील जनसंघर्ष समितीच्या सदस्यांनी रविवार (ता. १५) नक्षलवाद्यांनी त्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आरेवाडा गावाजवळ उभारलेले नक्षल स्मारक जाळून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला.

जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली, तरी या भारत देशात निष्पाप आदिवासी बांधवांच्या हत्या व त्यांच्यावर होणारे हिंसाचार थांबले नाहीत, विकास झालेला नाही. त्याचे मुख्य कारण जंगलात लपून बसलेले क्रूरकर्मा नक्षलवादी आहेत. या नक्षलवाद्यांनी स्वतःची दहशत पसरवत आदिवासी बांधवांना आपल्या मगरमिठीत दाबून ठेवले आणि त्यांच्या भीतीपोटी शहरी लोकांसोबत त्यांचा दूर दूरपर्यंत संपर्क येऊ देत नाहीत. संपर्क झालाच तरी त्याला पोलिस गुप्तचर म्हणून मारण्यात येते.

मुरंगल गावात पहिल्यांदाच झेंडावंदन; नक्षल स्मारक जाळून स्वातंत्र्यदिन
देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर! वाचा कारण...

शनिवारी भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे जनसंघर्ष समिती व ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात आदिवासी पारंपरिक नृत्य, गायन व तसेच देशभक्तिपर गीत व नृत्य आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत अतिदुर्गम भागात असलेल्या कसनसूर, पल्ली, मडवेली, मरमपल्ली, जिंजगाव या गावांतील मुलामुलींनी सहभाग घेतला. यावेळी व्यसनमुक्ती व स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले.

त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट २०२१ रोजी जनसंघर्ष समितीने मुरंगल या गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांसोबत ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन आनंदाने साजरा केला. त्यानंतर जनसंघर्ष समिती मुरंगल या गावातून रवाना होऊन आरेवाडा या गावाला जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेले नक्षलवाद्यांचे स्मारक दिसले. जनसंघर्ष समितीच्या सदस्यांनी ते स्मारक तोडून जाळून राख केले.

आदिवासी बांधवांना नक्षल्यांच्या मगरमिठीतून सोडवण्यात पोलिस यंत्रणा तसूभरही कसर सोडत नाही. परंतु, नक्षलवाद्यांचा विरोध करणे एक भारतीय म्हणून आपलेही कर्तव्य आहे. म्हणूनच अशा देशसेवेसाठी जनसंघर्ष समिती नेहमी तत्पर असल्याचेही शिर्के यांनी म्हटले आहे. यावेळी जनसंघर्ष समितीचे अभिषेक सावरकर, दत्ता शिर्के, डॉ. श्रुती आष्टनकर, डॉ. संदीप आकरे, आशीष चौधरी, जगदीश वानोडे, तेजस खंते, महेश वाघ आदी उपस्थित होते.

मुरंगल गावात पहिल्यांदाच झेंडावंदन; नक्षल स्मारक जाळून स्वातंत्र्यदिन
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

पहिल्यांदाच ध्वजारोहण

मुरंगल हे गाव भामरागडपासून २२ किलोमीटर अंतरावर असून ते अतिदुर्गम भागात आहे. या गावामध्ये ७५ वर्षांत प्रथमच स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्या गावातील लहान मुलांना शालेय साहित्य व मोठ्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. तसेच जनसंघर्ष समितीच्या डॉक्टरांनी आरोग्य शिबिर आयोजित करून गरजू रुग्णांना औषधे दिली. गरोदर मातांकडे विशेषतः लक्ष देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com