कृषी क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करा : भगतसिंग कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari

कृषी क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करा : भगतसिंग कोश्यारी

अमरावती - पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉ. पंजाबराव देशमुख हे असे एकमेव मंत्री होते, जे एकटे शेती आणि शेतकऱ्यांबाबत विचार करीत होते. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे आज आपण अन्नधान्याच्या बाबत आत्मनिर्भर झालो आहोत. देशाला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करायचे असेल तर आज भाऊसाहेबांचे कार्य डोळ्यांसमोर ठेवून कृषी क्षेत्रात प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज (ता. २४) येथे केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, महापौर चेतन गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या काळातील पिढी पूर्णपणे देशासाठी व समाजासाठी समर्पित होती.

भाऊसाहेब केवळ शिक्षणमहर्षीच नव्हते, तर ते शेतीमहर्षीसुद्धा होते. त्यांच्या स्वप्नातील देश निर्माण करण्यासाठी शिवाजी कृषी महाविद्यालयाकडून त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणातून पापळ येथे कृषी महाविद्यालय निर्मितीस मान्यता मिळावी आणि भारत सरकारने भारतरत्न सन्मान देऊन भाऊसाहेबांचा गौरव करावा, अशी मागणी केली.

हेही वाचा: मॅजिक चहा! अब्बास कागदाच्या भांड्यात तयार करतो चहा

डॉ. किशोर फुले यांनी कार्यक्रमाचे संचालन व सचिव शेषराव खाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी पवनीत कौर, संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, अ‍ॅड. गजानन पुंडकर, कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशव गावंडे, केशव मेतकर, सचिव शेषराव खाडे, डॉ. महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ. पी. एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले, डॉ. पद्माकर सोमवंशी, प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे संकेत

भाऊसाहेबांच्या जन्मभूमीत पापळ येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्याबाबत लवकरच विचार करण्यात येईल. जरा थांबा, लवकरच चांगली बातमी हाती येईल, असे संकेत राज्यपालांनी यावेळी दिले.

loading image
go to top