Abbas Makes Tea On Paper : मॅजिक चहा! अब्बास कागदाच्या भांड्यात तयार करतो चहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tea

मॅजिक चहा! अब्बास कागदाच्या भांड्यात तयार करतो चहा

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

आर्णी (जि. यवतमाळ) : प्रत्येकाला जादू पाहायला आवडते. वेगवेगळ्या जादूंची नेहमीच चर्चा होते. तसेच कोणामध्ये काही विशेष गुण असतात. कोणतेही काम ते इतक्या चतुराईने करतात की लोक पाहतच राहतात. असे ते वर्षानुवर्ष करीत असल्याने शक्य होते. टीव्ही किंवा सोशल मीडियावर असे अनेक अचंबीत करणारे व्हिडिओ आपण पाहतो. असाच एक प्रकार आब्बास भाटी या युवकाने केला आहे. आता त्याचीच चर्चा यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ पाहतो. कोणी पाण्यात पकोडे तळतो तर तर कोणी गरम तेलात हात बुडवतो. तर कोणी आगीशी खेळतो. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. उकळत्या तेलात हात टाकल्यास जळल्याशिवाय राहत नाही. मात्र, त्या व्यक्तीच्या हाताला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचत नाही.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

चहा हे पेय प्रत्येकाला प्यायला आवडते. प्रत्येकाच्या घरी चहा तयार होतो. यासाठी एका भांड्याचा वापर केला जातो. गॅसवर किंवा चुलीवर चहा चांगला गरम करून प्यायला जातो. घरी कोणी अतिथी आले तर चहा घेतल्या शिवाय जात नाही. पाहुण्यांना सर्वांत अगोदर चहाच दिला जातो. कारण, चहा हा कमी खर्चात तयार होणारा पेय आहे. चहा हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय झालेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आर्णी तालुक्यातील दाभडी येथील शेतकऱ्यांनी ‘चाय पे चर्चा’ करून संपर्क साधला होता. तेव्हा दाभडीच्या चायची चर्चा भारतभर झाली होती. आता आर्णी तालुक्यातील चहाची चर्चा तालुक्यात होत आहे. परंतु, हा चहा नरेंद्र मोदी यांनी पाजला नसून तालुक्यातील कवठा बाजार येथील रहिवासी अब्बास भाटी या युवकाने तयार केलेला आहे. कारण, हा चहा विशेष आहे.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

अब्बास भाटी या युवकाने चहा तयार करण्यासाठी केणत्याही भांड्याचा वापर केलेला नाही तर कागदाचा गंज म्हणून वापर केला. आगीजवळ कागद नेला तर क्षणात जळून खाक होतो. परंतु, अब्बास भाटी हा आग ओकणाऱ्या विटांच्या चुलीवर कागदाचा गंज तयार करून त्यामध्ये पाणी, दूध, चहापत्ती, साखर, विलायची टाकून चवदार चहा करून उपस्थितांना पाजतो. ही कमालीची जादू आहे. म्हणूनच हा कागदावर उकळी घेणारा चहा तालुक्यातील चर्चेचा विषय ठरत आहे.

loading image
go to top