Wardha Crime : अजबच! चोरीच्या पैशातून केले भारत भ्रमण; मुक्काम उघड्यावर, कपडे लाँड्रीत

चोऱ्या करून मिळविलेल्या पैशातून भारत भ्रमण करणारा अजब चोर वर्धा पोलिसांच्या हाती आला.
crime
crimesakal
Updated on

वर्धा - गरजेपोटी आणि शौक पूर्ण करण्याकरिता चोरी केल्याच्या अनेका घटना आहेत. परंतु, चोऱ्या करून मिळविलेल्या पैशातून भारत भ्रमण करणारा अजब चोर वर्धा पोलिसांच्या हाती आला. या चोरट्याने चोऱ्या करून अख्खा देश पालथा घातला. प्रवीण विनायक आक्केवार (वय-५६) असे या चोराचे नाव असून चंद्रपूर शहरातील एकोरी वॉर्ड तो राहतो.

आरोपी प्रवीण चोरी करायचा आणि त्या पैशातून फिरायला जायचा. असा त्याचा एकमेव उपक्रम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्या ठिकाणाहून रेल्वे स्थानक जवळ असल्याने तो पुन्हा कुठेतरी फिरायला जाण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. या चोरट्याचा मुक्काम उघड्यावर राहायचा.

शहराच्या आसपास घनदाट झाडांच्या आधाराने त्याचा मुक्काम असायचा. तिथे फाटके कपडे घालून राहणारा हा चोर पर्यटनाला जाताना मात्र नवे कपडे घालून निघायचा. विशेष म्हणजे त्याचे कपडे नागपुरातील एका लाँड्रीत धुण्याकरिता जात असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

आरोपीस विचारपूस केली असता त्याने वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, पुलगाव, हिंगणघाट, सेवाग्राम, सावंगी (मेघे), तसेच अमरावती शहरातील गाडगेनगर, वरोरा (जि. चंद्रपूर) येथील बंद घराचे लॉक तोडून एकूण ११ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे कबुल केले. चोरी करताना सोने, चांदी आणि रोख अशाच वस्तू चोरण्याची त्याची खासीयत आहे. त्याला अटक करून पुढील तपास सुरू आहे.

अब्दुल कलामांची लायब्ररीही पाहिली

भारतातील दक्षिण, उत्तर, पश्चिम आणि पूर्वेचा भाग फिरून आलेल्या या चोरट्याने अब्दुल कलाम यांची लायब्ररीही पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. यासोबतच त्याने हरिद्वार, ऋषिकेश, बालाजी यासारख्या ठिकाणी देवदर्शनही केले.

चोरीच्या पैशातून फिरण्याचा आणि त्या काळात ऐश करणाऱ्या या चोरट्यावर आतापर्यंत २०० च्या आसपास गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वर्ध्यात त्याला यापूर्वीही अटक झाली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

जवळ होता सोने मोजण्यासाठी वजनकाटा

माया सुरेश मुंजेवार (रा. जाम, ता. समद्रपूर) यांच्या घरी झालेल्या चोरीच्या संबंधाने पोलिस शहरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान एक व्यक्ती बजाज चौक, रेल्वे उड्डाण पुलाखाली बसून असून त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव प्रवीण आक्केवार असे असल्याचे त्याने सांगितले.

या चोरट्याच्या अंगझडतीत एक सोन्याची अंगठी व वेगवेगळ्या आकारांचे सोन्याचे तुकडे असे एकूण आठ लाखांवर किमतीचे १०५.८३० ग्रॅम सोने आणि एक चांदीचा शिक्का, रोख ३८ हजार रुपये रोख, मोबाईल, घरफोडीकरिता वापरण्यात येणारी अवजारे, एक चाबीचा गुच्छा व एक इलेक्ट्रॉनिक पॉकिट वजनकाटा मिळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com