चिरेखनीचा जवान अरुणाचल प्रदेशात शहीद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोंदिया : चिरेखनीचा जवान अरुणाचल प्रदेशात शहीद

गोंदिया : चिरेखनीचा जवान अरुणाचल प्रदेशात शहीद

तिरोडा (जि. गोंदिया) : तालुक्याच्या चिरेखनी येथील महेंद्र भास्कर पारधी (वय ३७) हा जवान अरुणाचल प्रदेश (डिब्रुगड) येथे देशसेवा करीत असताना शहीद झाला. ही घटना मंगळवारी (ता. २२) दुपारी १ ते २ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे चिरेखनी गावात शोककळा पसरली आहे.

महेंद्र पारधी हे २००४ मध्ये बेलगाम मराठा सेंटरमध्ये (कर्नाटक) येथे हवालदार म्हणून रुजू झाले होते. या पदावरील कर्मचाऱ्‍यांना २४ वर्षे सेवा द्यावी लागते. त्यानंतर ते सेवानिवृत्त होतात. महेंद्र पारधी यांच्या सेवानिवृत्तीला आठ वर्षे शिल्लक होती.

गुरुवारी (ता. २४) त्यांचे पार्थिव चिरेखनी येथे पोहोचणार असून दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. महेंद्र यांच्या पश्चात पत्नी गायत्री, जानव (वय १०) व शिवाय (वय ४) अशी दोन मुले आहेत. आमदार विजय रहांगडाले, काँग्रेसचे राधेलाल पटले, माजी आमदार दिलीप बन्सोड, किरणकुमार पारधी, राजलक्ष्मी तुरकर, राजेंद्र तुरकर, ओम कटरे, जितेंद्र चौधरी, योगेश पारधी आदींनी शहीद महेंद्र यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वना केली.

अशी घडली घटना

अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात सहा जवान पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, जोरात बर्षवृष्टी होत होती. सर्वांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. रस्ते सापडत नव्हते. अशात तुफानी वातावरणात सैनिक अडकले होते. त्यातच महेंद्र पारधी यांना वीरमरण आले.

Web Title: Indian Army Soldier Martyr Arunachal Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..