माणुसकी संपली! दुसऱ्यांचे सोडा होऽऽ जखमी रखवालदाराची पत्नी आणि मुलांनाच नाही चिंता, रुग्णालयाच्या आवारात आहे पडून

The injured guard is lying in the hospital in Amravati
The injured guard is lying in the hospital in Amravati

अमरावती : चार महिन्यांपूर्वी रायलीप्लॉट येथील शिकस्त इमारत कोसळून जखमी झालेल्या रखवालदाराच्या हालअपेष्टा अद्याप संपलेल्या नाहीत. पायावर योग्य उपचार न झाल्यामुळे ते बेवारस स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात तडफडत पडले आहेत.

बाळू (वय ५९ वर्षे) हे अनेक वर्षांपासून रायलीप्लॉट परिसरातील एका व्यापारी संकुलात रखवालदार म्हणून काम करीत होते. एक दिवस मध्यरात्रीच्या सुमारास दुमजली शिकस्त इमारत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून बाळूसह अन्य एक असे दोघे जखमी झाले होते. बाळूची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्रथम इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नागपूरला हलविले.

नागपुरात दोन महिने उपचार घेतल्यानंतर सुटी देण्यात आली. पुढील उपचार अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना पुन्हा येथील इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, ते बरे होऊ शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी इमारत कोसळली तेव्हा राखणदारीसाठी तैनात बाळूला इमारत मालकाने मदत केली नाही किंवा याबाबत संबंधित मालकाने येऊन विचारणा केली नाही.

त्यांचे दोन मुले व पत्नीनेही चौकशी केली नाही, असे त्याने सांगितले. ते बेवारस व्यक्तीसारखे एका कोपऱ्यात पडून आहेत. पायाला प्लास्टर असून, जखमही चिघळत आहे. नीट उभेही राहता येत नाही. एखाद्या व्यक्तीने खायला काही अन्न दिले किंवा कुणी चहा दिला तेवढ्यावरच उदरनिर्वाह सुरू आहे.

पोलिसांच्या सहानुभूतीला मर्यादा

इर्वीनच्या पोलिस चौकीत तैनात सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप राऊत यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी जखमी बाळूची चौकशी करून त्यांना काही खाद्यपदार्थ आणून दिले. परंतु, त्यांच्या प्रयत्नालाही मर्यादा येतात.

सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा
संबंधित रुग्ण दुसऱ्यांदा इर्वीनमध्ये दाखल झाला असल्याची माहिती नाही. त्यांच्यावर उपचार करता येईल. त्यांना इतर मदत अपेक्षित असेल तर सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.
- डॉ. शामसुंदर निकम,
जिल्हाशल्य चिकित्सक, अमरावती

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com