आता आपल्याला पॅरोल मिळणार नाही, या चिंतेतून कैद्याने लावला गळफास, काय असाव कारण...

रूपेश खैरी
Thursday, 6 August 2020

वर्धा शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाकडून शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्धा : येथील कारागृहात हत्येच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत असताना कैद्याने दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. गोपीचंद रामचंद्र डहाके (वय ३८, रा. उमरखेड, जि. वर्धा) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या मूळचा उमरखेड तालुक्यातील असलेला गोपीचंद रामचंद्र डहाके हा दीड वर्षापासून वर्ध्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. यापूर्वी त्याने यवतमाळ, अमरावती येथे कारागृहात शिक्षा भोगली असल्याची माहिती आहे. पॅरोलवर सुटल्यावर कारागृहातील गैरहजेरीमुळे त्याला पुन्हा पॅरोलर सुटी मिळणार अथवा नाही, या चिंतेत तो होता. त्यामुळे त्याने नैराशेतून आत्महत्या केली असल्याची बाब समोर आली आहे.

वर्धा शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाकडून शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - व्यसनाधीन पित्याच्या अंगात संचारला राक्षस, मुलीवर केला चाकूहल्ला आणि स्वतः...

पॅरोल मिळणार नाही याची होती चिंता

खून प्रकरणी शिक्षा भोगत असतानाही त्याला पॅरोलवर सोडले होते. मात्र, पॅरोलवर सुटी घेत तो बराच काळ परत आला नाही. आता आपल्याला परत पॅरोल मिळणार नाही, हे त्याला समजले होते. यामुळे तो चिंतेत होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inmate commits suicide in Wardha jail