esakal | प्रेरणादाई! सिगारेटच्या थोटक्‍यांपासून कुशन
sakal

बोलून बातमी शोधा

कुशन

प्रेरणादाई! सिगारेटच्या थोटक्‍यांपासून कुशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सिगारेट शौकीन थोटके कुठेही फेकून देतात. कचरा ठरणारे हे थोटकेच आता कुशन तयार करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. नागपूरच्या "स्वच्छ' संस्थेद्वारे शहरातून जवळपास महिन्याला दीडशे किलो थोटके संकलित करीत त्यावर प्रक्रिया करून कुशन तयार करण्यात येत आहेत.
नवसंकल्पांना मूर्तरूप देत त्यापासून केवळ उद्योगच नव्हे, तर रोजगारनिर्मिती करण्याच्या उद्देशाने "स्वच्छ' एनजीओने या कामाची सुरुवात केली. सिगारेटच्या थोटक्‍यांमध्ये सेग्रीगेड कॉटन असते. ते फेकल्यावर पक्षी वा प्राण्यांनी खाल्याने त्यामधील सेलोलोस आणि रिसोकॉन हानिकारक ठरतात. "स्वच्छ'ने शहरातील विविध ठिकाणांची निवड करीत जवळपास दीडशे किलो थोटके संकलित केले. हे थोटके जमा करणाऱ्या युवकांना एका किलोवर शंभर ते दीडशे रुपयेही दिले जाते.
"स्वच्छ' असोसिएशनद्वारे यवतमाळ येथे प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. संकलित थोटक्‍यांवर प्रक्रिया करून "सेगीगेड बड्‌स' तयार करण्यात येते. यातूनच रेकरॉनऐवजी 80 टक्के "सेग्रीगेड बड्‌स'चा वापर करीत कुशन तयार केले आहे. विशेष म्हणजे हे कुशन विविध किड्यांपासून वाचविणारेही आहे. त्यामुळे ते नागरिकांना फायदेशीर ठरणारे आहेत. बार आणि पानठेल्यावर विशिष्ट डबा दिला आहे. या डब्यात सिगारेट विझवून थोटके जमा करण्याचे काम करण्यात येते.
टाकाऊ वस्तूंपासून मनुष्य उपयोगी वस्तू तयार करण्याचे काम "स्वच्छ' एनजीओद्वारे केले जाते. यामुळे पर्यावरण संरक्षणाचा हेतूही साध्य होणार आहे.
-अनसूया काळे,
अध्यक्ष, स्वच्छ असोसिएशन, एनजीओ

loading image
go to top