Success Story : एकाच कुटुंबातील तिघे भावंडे एमबीबीएस झाल्याची अभिमानास्पद कामगिरी
MBBS Graduates : संग्रामपूरच्या राजनकर कुटुंबातील प्राची, प्रतीक आणि दीपक या तिघा भावंडांनी यंदा एमबीबीएस पदवी मिळवून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे.
संग्रामपुर : मेहनत, चिकाटी आणि एकमेकांना दिलेली साथ याचे उत्तम उदाहरण संग्रामपुर येथील राजनकर कुटुंबाने घालून दिले आहे. राजनकर कुटुंबातील तिघे भावंडे प्राची, प्रतीक आणि दीपक यांनी यंदा एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.