esakal | लघु, मध्यम प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

खामगाव: प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा

खामगाव: प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

खामगाव (जि. बुलडाणा) : पाटबंधारे उपविभाग खामगाव अंतर्गत खामगाव, जळगाव जामोद तालुक्यातील दोन लघु व मध्यम प्रकल्प क्षेत्रात व परिसरात यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्याच्या दिवसात या प्रकल्पातील पाण्याचा साठा धोक्याची घंटा ठरू शकते. कारण या प्रकल्पातून अनेक गावांमधील गावकऱ्यांची तहान भागवली जात आहे. तर हजारो हेक्टर जमिनीला सिंचनासाठी पाणी देण्यात येते.

हेही वाचा: विजय वडेट्टीवार म्हणाले, एका बापाची अवलाद असशील तर...

यंदाच्‍या पावसाळ्यात टाकळी लघु प्रकल्प शंभर टक्के भरला आहे, परंतु उर्वरित प्रकल्प क्षेत्रात पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने त्या प्रकल्पात ३ सप्टेंबर २०२१ पर्यंतची पाणी साठ्याची स्थिती बिकट आहे. खामगाव, नांदुरा व खामगावच्या औद्योगिक वसाहतीला गेरू, माटरगाव येथील ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

यंदा या प्रकल्पात ४ सप्टेंबरपर्यंत २५.६० दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. याची टक्केवारी ७६.५ इतकी आहे. तर गतवर्षी ३ सप्टेंबर २०२० रोजी या प्रकल्पात ३३.३ दलघमी इतका पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी शंभर टक्के होती. त्याचप्रमाणे मस, गोडाडा, ढोरपगाव हे प्रकल्प शंभर टक्के भरले होते आणि यातील पाणी सांडव्यावरून वाहत होते.

हेही वाचा: शिळा भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने; शेती करणे उठले जीवावर

ज्ञानगंगा प्रकल्प हा शंभर टक्के भरल्याने खामगाव व नांदुरावासीयांना पाण्याची टंचाई भासली नाही आणि शेतकऱ्यांना रब्बी, भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी पाणी देण्यात आले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या पाण्याच्या माध्यमातून रब्बी व भाजीपाल्याचे पीक घेतल्यामुळे त्यांना दुहेरी उत्पन्न घेता आले. गारडगाव हा लघु प्रकल्प गतवर्षीच्या पावसाळ्यात शंभर टक्के पाण्याने भरला होता.

तर यंदा ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत यात केवळ मृत साठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर सप्‍टेंबर महिन्‍यात हवामान विभागाने चांगल्‍या पर्जन्‍यमानाचा अंदाज वर्तविला असून, समाधानकारक पाऊस झाल्‍यास प्रकल्‍पातील पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते.

प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा साठा

ज्ञानगंगा २५.६० दलघमी ७६.५ टक्के, मस ८.०१ दलघमी ५३.२६ टक्के, धानोरा ०.१८ दलघमी २०.४० टक्के, राजुरा ०.७८ दलघमी २३.०१ टक्के, गोडाडा ०.४६ दलघमी २६.१५ टक्के, टाकळी एक पॉईंट तेरा दलघमी शंभर टक्के, बोरजवळा ०.०९ दलघमी ९.९४ टक्के, गारडगाव निरंक, पिंपरीगवळी ०.७० दलघमी २५.०८ टक्के, लांजुळ ०.९ दलघमी ५.५७ टक्के, ढोरपगाव ४.०९ दलघमी ७०.०३ टक्के. यंदा प्रकल्प क्षेत्रात पडलेला एकूण पाऊस मिलिमीटर मध्ये पुढीप्रमाणे आहे. ज्ञानगंगा ३४८, मस ३४७, धानोरा ४५१, लांजुळ ४८३ लांजुड प्रकल्पातील जलसाठा.

loading image
go to top