esakal | शिळा भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने; शेती करणे उठले जीवावर
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

शिळा भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने; शेती करणे उठले जीवावर

sakal_logo
By
राम वाडीभस्मे

धानला (जि. नागपूर) : एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक व मानवी संकटांतून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाला भाव मिळत नसल्याने मोहभंग होत आहे. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने विकत घ्यायचा आणि नंतर तोच शिळा झालेला भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने विकायचा, असा गोरखधंदा केला जात आहे. घाम गाळून फुलविलेल्या भाजीपाल्याच्या अत्यल्प दरानेही शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडत आहे. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेणासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघत आहे.

हेही वाचा: पाच जण बुडून मेल्याचे प्रकरण : तिघांचे मृतदेह सापडले

मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी शेतात सिंचनाची सुविधा करून पारंपारिक शेतीला आळा घालून भाजीपाला पीक घेत आहेत. लागवड ते बाजारपेठेपर्यंतचा भाजीपाल्याचा प्रवास मोठा कठीण आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपल्यानंतर भाजीपाला कुठे बाजारपेठेपर्यंत पोहोचतो. वन्यप्राण्यांचा हैदोस, निसर्गाचा लहरीपणा, हवामान बदल यामधून बचावलेला भाजीपाला शेतकरी मोठ्या आशेने बाजारात आणतात. मात्र, येथे आल्यानंतर त्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने हर्रासी पद्धतीद्वारे खरेदी केला जातो.

ठोक पद्धतीने शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात वांगे, टमाटे, कोबी, कारले, चवळी, गवार, भेंडी आदी भाजीपाला घेतला जातो. नंतर हाच भाजीपाला व्यापाऱ्यांकडून पाव, अर्धा किलो, एक किलो अशा स्वरुपात ग्राहकांना विकला जातो. सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे या आकडेवारीवरून सांगते.

हेही वाचा: चंद्रपूर : माराई देवीला बकरा चढवला अन् सोडला; मात्र...

शेतकऱ्यांकडून ५-१० रुपये किलोप्रमाणे खरेदी केलेली कारली नंतर ग्राहकांना २५ ते ३0 रुपये दराने व्यापारी विकतात. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत असल्याची ओरड होत आहे. प्रत्यक्षात मात्र या भावाचे दाम शेतकऱ्यांच्या खिशात जशास तसे जात नसल्याचे वास्तव आहे. समाधानकारक भाव नसल्याने फारसे उत्पन्न हाती येत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

प्रति किलो दराने खरेदी-विक्री

ठोक खरेदी रुपये व्यापारी चिल्लर विक्री रुपये

  • कारले ५ २५

  • चवळी १० ५०

  • वांगी ७ २०

  • भेंडी ५ २५

हेही वाचा: राजेंद्र शिंगणेंचा रस्त्यावर उतरण्याचा अजब सल्ला; पाहा व्हिडिओ

"मागील वर्षी चवळी हे भाजीपाला ५५ रुपये किलोपर्यंत ठोक बाजारात जात असल्याने मी पारंपरिक धान, कापूस व इतर पिकांना आळा घालून भाजीपाला पिकाकडे वळलो. आधी कमी असलेली शेती यंदा वाढवली. मात्र भाव नसल्याने निराशा हातात अली आहे."

- रामकृष्णा देवनेनी, प्रगतशील धानला

"माझ्याकडील कमी शेती असल्याने भाजीपाला शेतीकडे गेल्या काही वर्षांपासून वळलो. परंतु यंदाचे वर्ष तर मारक ठरले, लागवड खर्चही निघत नाही. आधीच कोरोनामुळे बरबादीचे लक्षण समोर आले. आता कसे सावराव हेच कुणाला ठाऊक.?"

- राजेश हटवार, भाजीपाला उत्पादक, दहेगाव

loading image
go to top