(Video) शेतकरीपुत्राचा आविष्कार, जुगाड टेक्‍नॉलॉजीने शेतमशागत, वाचा सविस्तर...

रूपेश खैरी
Friday, 3 July 2020

ज्यांच्याकडे शेतात काम करण्यासाठी बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतात कामासाठी बैलजोडी नसल्यामुळे व शेती अवजारे महाग असल्यामुळे शेतकऱ्याच्या पोराने शक्कल लढवली आहे.

वर्धा : शेतात धान्य पिकविण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांनी जुगाडू पद्धतीचा वापर करून शेतीत सोनं पिकवलं आहे. आता बैलजोडी सहज उपलब्ध होत नसल्याने गाडी दुरुस्ती करणाऱ्या शेतकरी पुत्राने शेतीच्या मशागतीसाठी मिनी कल्टीवेटर तयार केला आहे. दोन्ही हाताने ढकलल्या जाणाऱ्या या कल्टीवेटरने शेतीची मशागत आता शक्‍य झाले आहे.

सध्या राज्यात शेतीच्या कामाला मोठा वेग आला असून शेतकरी शेतात दिवसभर राबत आहेत, पण यामध्ये ज्यांच्याकडे शेतात काम करण्यासाठी बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांसाठी मिनी कल्टीवेटरच्या रुपात आनंदाची बातमी आहे. शेतात कामासाठी बैलजोडी नसल्यामुळे व शेती अवजारे महाग असल्यामुळे भारसवाडा येथील शेतकऱ्याच्या पोराने चक्क टाकाऊ वस्तू पासून मिनी कल्टीवेटर बनविण्याची शक्कल लढवली आहे.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्‍यातील भारसवाडा येथील जुबेर पठाण ह्याचे गावात छोटेसे दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. या 25 वर्षीय शेतकरी पुत्राने त्याच्याजवळ शेतीअवजारे विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकीच्या टाकाऊ स्पेअर पार्ट व विविध टाकाऊ वस्तूपासून हे कल्टी वेटर बनविले आहे. हे कल्टीवेटर दीड लिटर पेट्रोलमध्ये एक एकर शेतीची डवरणी, पेरणी, खत टाकणे, तिफन करू शकते. साधारणतः एक एकर शेतीचे काम करण्यासाठी या कल्टी वेटरला एका तासाचा वेळ लागतो.

प्रेमप्रकरणात झाला वाद, तिच्यावर केले सपासप वार आणि...

पैशाची अन वेळेचीही बचत

शेतकरी पुत्राने तयार केलेल्या या कल्टीवेटरने श्रम आणि पैशाची बचत होते. यामुळे शेतकऱ्यांकडून याला पसंती मिळत आहे. हे काम एकटा शेतकरी करू शकतो. असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

हे मिनी कल्टीवेटर हाताळायला एकदम सोपे असून यामुळे ज्या शेतकऱ्यांजवळ बैल जोडीनाही वा शेती अवजारे विकत घेऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

सहा हजार रुपयांचा खर्च

घरी दीड एकर शेती असल्याने बैलजोडी परवडत नाही. तसही बैलजोडी भाडयाने घेणे परवडत नाही. यातून बंद पडलेल्या दुचाकीच्या इंजिनचा वापर करून हे मिनी कल्टीवेटर निर्माण केले. याकरिता साधारणतः सहा हजार रुपयांचा खर्च आला. हे कल्टीवेटर एका तासात एक एकरात सहज डवरण करते.
जुबेर पठाण,
निर्माता, मिनी कल्टीवेटर

हेही वाचा : उपराजधानीला वादळी तडाखा, जिल्ह्यातही नुकसान, वीज यंत्रणेला मोठा फटका

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे

जुबेर पठाण यांनी तयार केले हे मिनी कल्टीवेटर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. एकराला दोनशे ते तीनशे रुपयात काम होते
प्रफुल राहणे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The invention of the farmer's son

Tags
टॉपिकस
Topic Tags: