प्रेमप्रकरणात झाला वाद, तिच्यावर केले सपासप वार आणि...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

उमेशचे त्याच्या घराच्या मागील भागात राहत असलेल्या महिलेवर प्रेम जडले. काही महिन्यांपूर्वी हे दोघेही घरून निघून गेले. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कुठे जात येत नव्हते. सारेच मार्ग बंद झाल्याने दोघेही परत घरी आले.

अर्जुनी/मोर (जि. गोंदिया) : वडसा परिसरात युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्‍याच्या कोकडी येथे एका महिलेला धारदार शस्त्राने गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली होती. धक्‍कादायक बाब म्हणजे आत्महत्या केलेला युवक व ती महिला अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील महागाव/सिरोली येथील असल्याचे समजताच दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली. उमेश श्‍यामराव जांभूळकर, (वय 28, रा. महागाव, शिरोली) असे मृताचे नाव आहे.

गंभीर जखमी असलेली महिला व गळफास घेतलेला युवक अर्जुनी-मोरगाव तालुक्‍यातील महागाव सिरोली येथीलच असून, ही घटना प्रेमसंबंधातून घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमेशचे त्याच्या घराच्या मागील भागात राहत असलेल्या महिलेवर प्रेम जडले. काही महिन्यांपूर्वी हे दोघेही घरून निघून गेले. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कुठे जात येत नव्हते. सारेच मार्ग बंद झाल्याने दोघेही परत घरी आले.

सैनिक मध्यरात्री पाणी पिण्यासाठी घरी गेला आणि पत्नीवर झाडल्या गोळ्या; स्वत:ही केली आत्महत्या

दरम्यानच्या काळात दोघेही आपापल्या गावी राहू लागले. उमेश आपल्या स्वगावी महागाव येथे तर ती महिला तिच्या माहेरी कोकडी येथे गेली. या काळात त्यांची अधूनमधून भेट व्हायची. काही दिवसांपूर्वी उमेश महिलेला भेटण्यासाठी कोकडी येथे गेला. यावेळी दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला.

संतापलेल्या उमेशने धारदार शस्त्राने दोन दिवसांपूर्वी महिलेला गंभीर जखमी केले. त्या महिलेवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज उमेशने वडसा येथील अंडरग्राउंड ब्रीज परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. प्रेम प्रकरणातून त्या महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची चर्चा आहे पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide by injuring woman

Tags
टॉपिकस
Topic Tags: