esakal | आता ग्रामीण भागात आयसोलेश वार्ड!
sakal

बोलून बातमी शोधा

Isolation ward in Akola rural

कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यासाठी ग्रामीण भागातही आयसोलेश (विलगीकरण कक्ष) वार्ड उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जागेची निश्‍चिती सुद्धा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सोमवारी (ता. ३०) दिली.

आता ग्रामीण भागात आयसोलेश वार्ड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यासाठी ग्रामीण भागातही आयसोलेश (विलगीकरण कक्ष) वार्ड उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जागेची निश्‍चिती सुद्धा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सोमवारी (ता. ३०) दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद आणखी सक्रिय झाली असून, साेमवारी (ता. ३०) सर्वपक्षीय नेते व प्रशासनामध्ये झालेल्या बैठकीत विविध चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकाची सेवा अधिग्रहित हाेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

बैठकीत आरोग्य विभागातील रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला. काही तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरता येतील काय, यावरही चर्चा केली. पदांबाबतची शासनस्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रक्तदान शिबिरांसाठी नयाेजन करण्यात आल्याची माहिती राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिली. पाच हजार मास्क, सॅनिटायझरच्या ४०० बाॅटल्स आणि डॉक्टरांसाठी आराेग्य केंद्रांमध्ये गाऊन वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांनी दिली. बैठकीला अध्यक्षा प्रतिभा भाेजने, उपाध्यक्षा सावित्री राठाेड, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे, मनिषा बाेर्डे, आकाश शिरसाट, पंजाबराव वडाळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रवक्ते राजेंद्र पाताेडे, अरूंद्धती सिरसाट, शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर, वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने, कॉंग्रेसचे सुनील धाबेकर, राकांच्या सुमन गावंडे, आराेग्य विभागाचे माध्यम विस्तार अधिकारी प्रकाश गवळी आदी उपस्थित हाेते.


आपातस्थितीसाठी घेणार रक्तदान शिबिर

  •  कोरोना विषाणूविरुद्धच्या लठ्यात रक्तचा तुटवडा निर्माण हाेऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत वंचित बहुजन आघाडीतर्फे रक्ताच्या ५ हजार बाॅटल्स संकलित हाेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी बैठकीत दिली.
  • शिवसेनेतर्फे २ एप्रिलपासून तालुका, सर्कलस्तरावर रक्तदान शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती गट नेते गाेपाल दातकर यांनी दिली.
  • शिबिरात एकदम गर्दी हाेणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक असून, संबंधितांचे फाेन नंबर घेऊन त्यांना त्याद्वारे दिनांक व वेळ कळवू शकताे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रक्तपेढींशी समन्वय साधून हे करता येईल, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. 
loading image