esakal | चालकाला "पायदळी' चिरडून ती तशीच धावत राहिली... 
sakal

बोलून बातमी शोधा

jcb

शुक्रवारी दिवसभर जेसीबीने माती बुजविण्याचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काम आटोपल्यावर जेसीबी घेऊन चालक तिरुपती बोबाटे घराकडे निघाला होता. तो तेलंगणातील टोकनी पारगाव येथील रहिवासी होता.

चालकाला "पायदळी' चिरडून ती तशीच धावत राहिली... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धाबा (जि. चंद्रपूर) : विहिरीचे खड्डे बुजवून परत येताना धावत्या जेसीबीचा चालक अचानक जमिनीवर कोसळला. यात घटनेत चालकाच्या डोक्‍यावरून जेसीबीचे चाक गेल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, चालकविरहीत असलेली जेसीबी जवळपास एक किलोमीटर अंतरावर जाऊन थांबली.

हा विचित्र अपघात धाबा गावापासून चार कि.मी.अंतरावर असलेल्या चेक सोमनपल्ली शेतशिवारात शुक्रवारी, 13 मार्च रोजी घडला. तिरुपती बोबाटे असे मृत चालकाचे नाव आहे. गोंडपिपरी तालुक्‍यात विविध योजनांमार्फत विहीर मंजूर झाल्या आहेत. विहिरीचे बांधकाम झाले आहेत. विहिरीसाठी खोदताना निघालेली माती जेसीबीच्या साह्याने बुजविणे सुरू आहे. जेसीबी पोडसा येथील प्रवीण घ्यार यांच्या मालकीची आहे.

अवश्य वाचा- एकाने केला बलात्कार, दुसऱ्यानेही सोडली नाही संधी...

अचानक जेसीबी आली मागे

शुक्रवारी दिवसभर जेसीबीने माती बुजविण्याचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काम आटोपल्यावर जेसीबी घेऊन चालक तिरुपती बोबाटे घराकडे निघाला होता. तो तेलंगणातील टोकनी पारगाव येथील रहिवासी होता. घराकडे निघालेली जेसीबी अचानक मागे आली अन्‌ चालक तिरुपती जमिनीवर कोसळला. जेसीबीचे चाक तिरुपतीच्या डोक्‍यावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, चालक नसतानाही जेसीबी जवळपास एक कि.मी. अंतर धावत राहिली, त्यानंतर जाऊन थांबली. 

loading image