चला, सुदृढ लोकशाहीची गुढी उभारूया!

विवेक मेतकर
शनिवार, 6 एप्रिल 2019

‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहू, प्रा.ज्ञानसागर भोकरे, प्रा.नागरे उपस्थित होते. त्यांनी ‘सकाळ’च्या आय विल वोट या उपक्रमाचे भरभरून कौतुक करताना विद्यार्थ्यांनाही मतदान करण्यास प्रेरीत केले.

अकोला  ः मतदान करणारे मोठया आभिमानाने आपण नुसते मतदान केले म्हणजे फार मोठे नैतिक कर्तव्य केल्याचा आव आणतात. पण मतदान कोणाला आणि का करावे हे पटल्याशिवाय केलेल्या मतदानाला काय अर्थ आहे? या दृष्टीने उमेदवारांची पार्श्वभूमी, पक्षांची भूमिका या बाबी मतदान करणाऱ्यांपैकी किती जण तपासून पाहतात? प्रत्येकाने या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला सुदृढ करण्यासाठीचा संकल्प डाबकी रोड परिसरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला.

‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहू, प्रा.ज्ञानसागर भोकरे, प्रा.नागरे उपस्थित होते. त्यांनी ‘सकाळ’च्या आय विल वोट या उपक्रमाचे भरभरून कौतुक करताना विद्यार्थ्यांनाही मतदान करण्यास प्रेरीत केले.

युवावर्गाला येत्या निवडणूकांमधून नेतृत्वाची गरज नसून उत्तम सेवेची अपेक्षा आहे.
- आकाश टिकार

महिला सक्षमीकरण आणि सुरक्षीततेसंदर्भात ठोस भूमीका असावी. त्यासोबतच समस्यांची जाण लोकप्रतिनिधीला असली पाहिजे.
-वैष्णवी दांगटे

कष्ट उपसून शेतकरी धान्य उगवितो. मात्र, त्यावरच आता आत्महत्येची वेळ आली आहे. नव्या सरकारने शेती-शेतकरी संदर्भात प्रभावी धोरण अवलंबिले पाहिजे.
- मिनल शेगावकर

नव्या सरकारने रोजगार निर्मितीवर भर द्याव. कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीच्या मोठ्या संधी आपल्याकडे निर्माण होऊ शकतात.
- शिवाणी रत्नपारखी

केंद्र सरकारने रेल्वेचा अर्थसंकल्प देशाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केला. मात्र, त्यातून काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. रेल्वेगाड्यांमधील सातत्याने वाढणारी गर्दी, कमी असणारी डब्यांची संख्या आणि अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
- सौरभ मारोठे

देशात सद्या अनेक समस्या आहेत. रोजगार, शिक्षण, कृषी क्षेत्र आदी समस्यांच्या गर्तेत आहे. आम्हाला असं सरकार हवं आहे जे आश्वासन न देता ठोस भूमिका घेऊन समस्यांवर उपाय शोधू शकेल.
- अश्विनी कूचर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IWillVote campaign in Akola