esakal | बापरे! पतसंस्थेच्या अध्यक्षांनीच केली कोट्यवधींची अफरातफर, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

jagruti financial organization president arrested in fraud case in tiroda of gondia

जागृती पतसंस्थेच्या 3 कोटी 31 लाख रुपये घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊराव नागमोती हा चौगान येथे गावाबाहेर असलेल्या एका कुलूपबंद घरात लपून बसला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच शुक्रवारी (ता.1) पोलिसांचे एक पथक ब्रह्मपुरी येथे गेले.

बापरे! पतसंस्थेच्या अध्यक्षांनीच केली कोट्यवधींची अफरातफर, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

तिरोडा (जि. गोंदिया) :  हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून फसवणूक करणाऱ्या मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पतसंस्थेच्या संस्थाध्यक्षाला शनिवारी (ता.2) सकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या चौगान येथून सिनेस्टाईल अटक करण्यात आली. भाऊराव नागमोती (वय 58)असे या संस्थाध्यक्षांचे नाव असून, तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे.        

हेही वाचा - "साहेब, मग आम्ही खेळायचं कुठे?" भगवाननगर मैदानावरच्या पोलिस जिमला...

जागृती पतसंस्थेच्या 3 कोटी 31 लाख रुपये घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊराव नागमोती हा चौगान येथे गावाबाहेर असलेल्या एका कुलूपबंद घरात लपून बसला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच शुक्रवारी (ता.1) पोलिसांचे एक पथक ब्रह्मपुरी येथे गेले. नागमोती हा ब्रह्मपुरी येथील न्यायालयात  हजर होणार असल्याची माहिती झाल्यावर पोलिस पथक त्याच्या मागावर होते. परंतु, तो न्यायालयात हजर झालाच नाही. दरम्यान, ठाणेदार योगेश पारधी यांना आरोपी नागमोती हा चौगान येथे कुलूपबंद घरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सिनेस्टाईल त्याला शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास पोलिसांनी पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा - बापरे! तब्बल ७० टक्के गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी; लाखनी, साकोलीसह लाखांदूर तालुके...

ठाणेदार पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरोडा पोलिसांच्या पथकाने आरोपी भाऊराव नागमोती याला पकडण्यासाठी व इतर 25 आरोपींना पकडण्यासाठी सहा पोलिस पथके तयार केली. आरोपी भाऊराव नागमोती हा त्याच्या पुतणीच्या नावे असलेल्या नागपूर येथील निवासस्थानी 30 डिसेंबर 2020 रोजी असल्याची गुप्त माहिती मिळाली. तिथे छापा टाकला. मात्र, आरोपी मिळाला नाही. त्यानंतर 31 डिसेंबर 2020 रोजी आरोपी नागमोती हा मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त होणार होता. तिथे त्याचा सत्कार होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिस मुंडीकोटा येथेसुद्धा गेले. परंतु, आरोपी मुंडीकोट्यातही नव्हता. दरम्यान, त्याला चंद्रपूर जिल्ह्याच्या बह्मपुरी तालुक्‍यातील चौगान येथून सिनेस्टाईल अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार योगेश पारधी, पोलिस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, गोपनीय विभागाचे नायक पोलिस शिपाई मुकेश महालगावे, पोलिस शिपाई संतोष समरीत यांनी केली.

हेही वाचा - राज्य सरकारचा प्रवास उलट दिशेने! सरपंचपदाचे आरक्षण...

आतापर्यंत तीन आरोपींना अटक -
मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 25 आरोपींवर तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. यात आरोपी लीलाधर यादोराव बांते (वय 55) याला 30 डिसेंबरला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपी समीर लेखराम मेश्राम (वय 29) याला 31 डिसेंबरला अटक करण्यात आली असून, त्याला सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिसरा मुख्य आरोपी भाऊराव नागमोती (वय 58) याला 2 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून, त्याला सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.   
 

loading image