बापरे! तब्बल ७० टक्के गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी; लाखनी, साकोलीसह लाखांदूर तालुके दुष्काळग्रस्त

दीपक फुलबांधे
Saturday, 2 January 2021

भंडारा जिल्ह्यात एकूण गावांची संख्या 898 आहे. त्यात खरीप गावांची संख्या 884 असून महसूल विभागाने 844 गावांची पैसेवारी घोषित केली आहे.

भंडारा : जिपैसेवारी 50 पेक्षा अधिक आहे. खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. 50 पेक्षा कमी पैसेवारी असल्यास शासनाकडून संबंधित भागात काही प्रमाणात सवलती दिल्या जातात. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिल्ह्यातील 884 गावांपैकी 636 गावांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षाकमी असून 208 गावांची वृष्टी आणि महापूर आल्यानंतरही 208 गावांची पैसेवारी 50 पेक्षाअधिक आहे.

हेही वाचा - नववर्षाच्या सुरुवातीलाच मन सुन्न करणारी घटना, एकाच्या आनंदाने दुसऱ्याचा अंत

भंडारा जिल्ह्यात एकूण गावांची संख्या 898 आहे. त्यात खरीप गावांची संख्या 884 असून महसूल विभागाने 844 गावांची पैसेवारी घोषित केली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या स्वाक्षरीने अंतिम पैसेवारी 31 डिसेंबरला जाहीर करण्यात आली आहे. 50 पेक्षाकमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये भंडारा तालुक्‍यातील 123, पवनी 89, तुमसर 95, मोहाडी 44, साकोली 94, लाखांदूर 89, लाखनी 102 गावांचा समावेश आहे. तसेच 50 पेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांमध्ये भंडारा तालुक्‍यातील 44, पवनी 52, तुमसर 48, मोहाडी 64 गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे साकोली, लाखांदूर आणि लाखनी तालुक्‍यात एकही गावाची पैसेवारी 50 पेक्षा अधिक नाही.

हेही वाचा - क्रिकेट सट्ट्यातील मुख्य सूत्रधारांचा शोध, पोलिसांनी...

दुष्काळी गावांत सवलती मिळणार -
50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना सवलती मिळतात. यात जमीन महसुलात सूट, शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली सक्तीने न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करणे आदींचा समावेश असतो. याचा लाभ जिल्ह्यातील 636 गावांना मिळणार आहे. जिल्ह्यातील 40 गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. ही गावे पाण्याखाली, अकृषक आणि प्रकल्पांतर्गत आहेत. 

हेही वाचा - कोरोना लसीचा ‘ड्राय रन’; लस उपलब्ध झाल्यानंतर तीन टप्प्यांमध्ये लसीकरण

दुष्काळी वर्ष तरीही पैसेवारी अधिक -
जिल्ह्यात यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्यांचे पीक उद्ध्‌वस्त केले. त्यानंतर तुडतुड्यासह विविध किडींनी धान फस्त केले. धानाचा उतारा निम्म्यापेक्षा कमी आला आहे. अशा स्थितीत संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी 50 पेक्षा कमी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, चार तालुक्‍यातील 208 गावांची पैसेवारी 50 पेक्षा अधिक आली. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना सवलती मिळणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop damaged in 70 percentage village of bhandara