जाम प्रकल्प ओव्हरफ्लो, तरीही पाणी मिळेना़

मनोज खुटाटे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

जलालखेडा, ता. 12 : पावसाने शेतकऱ्यांना जेरीस आणल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले. यातून उभारी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर टिकून आहे. यासाठी शेतकऱ्यांना कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची प्रतीक्षा आहे. नरखेड तालुक्‍यातील जाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असतानाही सिंचनाकरिता पाणी मिळत नसल्याची शोकांतिका या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.

जलालखेडा, ता. 12 : पावसाने शेतकऱ्यांना जेरीस आणल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले. यातून उभारी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर टिकून आहे. यासाठी शेतकऱ्यांना कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची प्रतीक्षा आहे. नरखेड तालुक्‍यातील जाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असतानाही सिंचनाकरिता पाणी मिळत नसल्याची शोकांतिका या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.

नरखेड तालुक्‍यात सिंचन प्रकल्पाचे काम गतिमान झाले नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील तीस वर्षांपासून काही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. यात जाम व कार प्रकल्पाचा समावेश आहे. मागील वर्षी जाम प्रकल्प न भरल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांपासून मुकावे लागले होते. तर अनेकांच्या फळबागा ही वाळल्या होत्या. पण, यंदा तालुक्‍यातील कार व जाम हे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. आता शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी पाण्याची गरज आहे. रब्बीच्या पेरणीसाठी पाण्याची गरज आहे. पण, कालव्यातून पाणी सोडण्यात न आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येणारी शेतजमीन ही हलकी असल्यामुळे पाण्याची गरज असते. हरभरा व गव्हाची पेरणी करायची असले तरीही पाणी आवश्‍यक आहे. मात्र, कालव्यातून पाणीच येत नसेल तर पेरणी करावी तरी कशी असा सवाल केला जात आहे.

कालवे झाले झुडपात गुडूप
नरखेड तालुक्‍यात जाम व कार प्रकल्प यांचे कालवे झुडपात गुडूप झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांत कालव्यांची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे या कालव्यातून सिंचनासाठी पाणी कसे येणार? हा खरा प्रश्न आहे. तसेच यातून पाणी सोडण्यात आले तर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अपव्यय होण्याची शक्‍यतादेखील आहे. तसेच कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी केव्हा पोहोचणार किंवा ते पोहोचेल की नाही? असादेखील प्रश्न आहे.

दोन तीन दिवस लागतील
रब्बी पिकांसाठी साधारण पाणी 15 नोव्हेंबरला सोडण्यात येते. पण, यंदा परतीचा पाऊस लांबल्याने आता 22 नोव्हेंबरला पाणी सोडू. कालव्याच्या सफाईचे काम सुरू आहे. पाणी सोडल्यानंतर साधारण दोन तीन दिवसात कालव्याच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल. आधी शेवटच्या टोकाला पाणी देण्यात येईल व नंतर मागे मागे येईल.
- प्रमोद गौरकर, शाखा अभियंता, जाम प्रकल्प

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The jam project overflows, but still no water