जनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रात्रं-दिवस झटत आहेत. यानिमित्ताने विदर्भातील सर्वात मोठी तब्बल ३ हजार मोटारसायकलीद्वारे शहरातील प्रमुख मार्गाने ‘संविधान बचाव’ रॅली काढण्यात येणार आहे.

खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रात्रं-दिवस झटत आहेत. यानिमित्ताने विदर्भातील सर्वात मोठी तब्बल ३ हजार मोटारसायकलीद्वारे शहरातील प्रमुख मार्गाने ‘संविधान बचाव’ रॅली काढण्यात येणार आहे.

खामगाव शहरात जनसंघर्ष यात्रेची जय्यत तयारी सुरु असुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर पालिका मैदान येथे भव्य स्टेज उभारणी, विद्युत रोषणाई तसेच मैदानावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, मुकुलजी वासनिक यांच्यासह विविध मान्यवर नेत्यांच्या स्वागतासाठी भव्य डिजीटल असे फलक लावण्यात आले आहे. मैदानावर चारही बाजुंनी तिरंगा दुपटट्याचे किनारा लागलेल्या असुन तिरंगी झेंडयामुळे सर्वत्र तिरंगामय वातावरण निर्माण झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर जनसंघर्ष यात्रेनिमित्त भव्य जाहीर सभा होणार असून याकरिता 1 हजार वाहनांद्वारे मतदारसंघातील सुमारे २५ हजार कार्यकर्ते स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने मागील साडेचार वर्षात जनतेला विकासाच्या नावावर केवळ भुलथापा दिल्या.तेव्हा या भाजपा सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी व सरकारचे वाभाडे काढण्यासाठी कांग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढली जात आहे. जनसंघर्ष यात्रेची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातुन काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने राज्यात एकप्रकारे आगामी निवडणूकीचे रणशिंग फुंकले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी व जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय राष्टीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु झाली आहे.

या जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी खामगांव येथे आगमन होणार आहे. या जनसंघर्ष यात्रेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकूल वासनिक, माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लीकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे सहप्रभारी तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा खासदार राजीव सातव, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ,  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर,  प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिसन ओझा,  प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड,  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाऊ बोंद्रे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार अमर काळे, महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार आशिष देशमुख यांच्यासह जिल्हयातील काँग्रेस पक्षाचे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, माजी आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शनिवारी दुपारी 3 वाजता या जनसंघर्ष यात्रेचे शेगांवहुन खामगांवात आगमन होणार आहे. शेगांव रोडवरील राणा लकी सानंदा एज्युकेशनल शावर समोरुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकत्र्यांच्या वतीने खामगांव शहरातील प्रमुख मार्गाने भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. ‘‘संविधान बचाव - मोदी हटाव’’ हे ब्रीद घेऊन ही मोटारसायकल रॅली निघणार असून विदर्भातील सर्वात मोठी ३ हजार मोटारसायकलीची रॅली राहणार आहे.

महागाई, बेरोजगारी , राफेल खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार यासह निवडणुकी दरम्यान शेतक-यांना संपुर्ण सरसकट कर्जमाफी, आरक्षण, दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मिती, शेतक-यांना 50 टक्के नफा देण्याचे हमीभावाचे आश्वासन या सर्व महत्वाच्या प्रश्नांचा पंचनामा काँग्रेसच्या नेते मंडळींद्वारे या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली असून  शहरात काँग्रेस नेत्यांच्या आगमनाचे मोठमोठे होर्डिंग्ज तसेच तिरंगी झेंडे लागले आहेत.मतदार संघातील गावा-गावात लाउड स्पीकरद्वारे व पत्रके वाटुन जनसंघर्ष यात्रेची जनजागृती करण्यात येत आहे. जागो-जागी डिजीटल बोर्ड, तिरंगी झेंडे लावण्यात आले असल्यामुळे सर्वत्र तिरंगामय वातावरण निर्माण झालेले आहे.खामगांवातील सभा ही विदर्भातील सर्वात मोठी सभा व्हावी याकरीता प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा हे लक्ष ठेउन असुन मतदार संघातील काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते सभेसाठी अथक परिश्रम घेत आहे.

जनसंघर्ष यात्रेच्या कार्यक्रमाचे संचालन देशप्रसिध्द शायर कलीम प्रतापगढी हे करणार आहे.तरी उपरोक्त कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खामगांव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रविण कदम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, महाराष्ट प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस डॉ. तब्बसुम हुसैन, अमरावती विभागाचे समन्वय धनंजयदादा देशमुख, काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ.भारतीताई पाटील, पं.स.सदस्य इनायतउल्ला खाँ, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, पं.स.सदस्य मनिष देशमुख, पं.स.सदस्या सौ.ज्योतीताई सातव, माजी जि.प.अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, न.प.चे माजी उपाध्यक्ष संतोष देशमुख, काँग्रेसचे जेष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव, शहर काँग्रेस सचिव अशोक मुळे, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.वसीमोदद्ीन, शहर अध्यक्ष बबलु पठान, तालुकाध्यक्ष शफीउल्ला खाँ, शेगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, एन.एस.यु.आय.चे शहर अध्यक्ष रोहित राजपुत, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव तुषार चंदेल, मयुर हुरसाड, मंगेश इंगळे, अजय तायडे, जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य शेख जुल्कर शेख चाँद, संजय तायडे यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, खामगांव मतदार संघातील समस्त काँग्रेसजणांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jana Sanghsh Yatra at Khamgaon